तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर्षीच्या नव्या बेदाण्याचे आगमन झाले. सोमवारी (ता. २०) सौद्यात नव्या बेदाण्यास १७५ रुपये किलो दर मिळाला. बाजार समितीचे सभापती ॲड. जयसिंग जमदाडे, अंबरीश साठे यांच्या उपस्थितीत सौदे काढण्यात आले.
बाजार समितीत धारेश्वर ट्रेडिंग कंपनी या भूपाल पाटील यांच्या अडत दुकानात हणमंत वसंत जाधव, (हातनोली, ता. तासगाव) यांच्या नवीन हिरव्या बेदाण्याच्या २२ बॉक्सला प्रती किलो १७५ रुपये दर मिळाला. राजयोग ट्रेडर्स खरेदीदार होते.
सोमवारी बेदाणा सौद्यात ३५० टन बेदाण्याची आवक झाली. २५० टन बेदाण्याची विक्री झाली. सरासरी दर हिरवा बेदाणा १२५ ते १९० रुपये, पिवळा बेदाणा १२० ते १६० रुपये व काळा नंबर २ बेदाणा ५५ ते ९५ रुपये असे दर निघाले आहेत. नवीन बेदाणास उच्चांकी दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
बाजारपेठेत सौद्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. नव्या बेदाण्याच्या सौद्यास बाजार समितीचे संचालक विवेक गजानन शेंडगे, सतीश झांबरे, कुमार शेटे, बाजार समितीचे सचिव चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक सचिव चंद्रकांत कणसे, व्यापारी मनोज मालू, अशोक बाफना, राहुल मालू, केतन भाई, राम माळी, मुकेश पटेल, अशोककुमार मजेठिया, सतीश माळी, विद्याधर पाटील, राहुल बाफना, विनय हिंगमिरे, जगन्नाथ घणेरे, संजय बोथरा, रामू बन्सल, किरण बोडके, अनुज बन्सल, सुशील हडदरे, राजेंद्र माळी व बाजार आवारातील खरेदीदार व्यापारी व सांगली, सोलापूर व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

0 comments:
Post a Comment