दालचिनी झाडाची साल ही मसाल्यात दालचिनी म्हणून वापरली जाते. पानांचा उपयोग तमालपत्र म्हणून करतात. साल आणि पानांतील अर्क काढून त्याचा वापर मसाला, औषधे, अत्तर उत्पादनात केला जातो.
नारळ बागेत दालचिनीची आंतरपीक किंवा मुख्य पीक म्हणून लागवड करता येते. मसाल्याच्या इतर पिकांच्या मानाने दालचिनी कणखर पीक असून पाण्याचा ताण सहन करू शकते. तसेच सावलीविना सलग पीक म्हणून दालचिनीची लागवड करता येते.
जाती
कोकण तेज
- सालीमध्ये ३.२० टक्के तेल असून सदर तेलात ७०.३३ टक्के सिनेमॉन अल्डेहाईड आणि ९३ टक्के युजेनॉल आहे. प्रति झाड २५० ग्रॅम साल आणि १५० किलो पाने मिळतात.
कोकण तेज पत्ता
- पानांमध्ये तेलाचे प्रमाण २.८ टक्के असून ८०.३० टक्के युजेनॉल आहे.
- याचा सुवास सिलोन दालचिनी तेलाशी तुलनात्मकरित्या मिळताजुळता आहे.
- प्रती हेक्टरी वाळलेल्या पानाचे ७.६८ टन आणि लाकडाचे ११.७६ टन उत्पादन मिळते.
साल काढणीची तपासणी
- तिसऱ्या वर्षी साल काढताना झाड तोडण्यापूर्वी दालचिनी खोडापासून सहज सुटी होते की, नाही ते चाकूच्या सहाय्याने पहाणे गरजेचे आहे. त्यासाठी धारदार चाकूने छोटासा त्रिकोणी अगर चौकोनी काप घेऊन खात्री करावी.
- साल सहज निघत असेल अशाच वेळी झाड तोडावे. झाड तोडताना साल सहज सुटत नसेल तर साधारणपणे आठवड्याच्या अंतराने तपासणी करावी.
- साल काढणे
- साल सहजगत्या सुटते अशी खात्री झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी साल काढताना खोडाचा २० सें.मी. भाग ठेवून करवत किंवा कोयत्याच्या सहाय्याने कापावी. त्यानंतर फांद्यांच्या आवश्यकतेनुसार २ ते अडीच फुटांचे तुकडे करावे. सदर फांद्याच्या तुकड्यावरील खडबडीत साल हलक्या हाताने चाकूच्या सहाय्याने खरवडून काढावी म्हणजे आतील पिवळसर चांगली साल दिसेल.
- अशा फांद्यांच्या तुकड्यावर दोन उभे काप एकमेकांच्या विरुद्ध दिशेला द्यावेत. नंतर चाकूच्या बोथट बाजूचा वापर करून साल सैल करून काढावी. फांद्या तोडल्यापासून शक्यतो ताबडतोब साल काढावी.
- झाड तोडल्यानंतर शिल्लक असलेल्या बुंध्यावर असंख्य धुमारे फुटतात. हे धुमारे साधारण २ वर्षांचे (लागवडीपासून पाचव्या वर्षी) झाले की, काढण्यायोग्य होतात. झाडावरील अंगठ्या इतक्या जाड व भुरकट रंगाच्या जून झालेल्या फांद्या धारदार करवतीने खोडाचा थोडा भाग शिल्लक ठेवून तोडाव्यात.
- साल वाळवणे
- साल सावलीत वाळवावी. साल काढलेल्या फांद्या उन्हात वाळवाव्यात. ज्या फांद्यांवरून साल काढलेली असते अशा फांद्या नंतरची साल बांधण्यास वापराव्यात.
- पहिल्या दिवशी साल बांधणीसाठी फांद्या उपलब्ध होणार नाहीत. म्हणून घरी असलेल्या काठ्या (वाळलेल्या) किंवा पाईप घेऊन त्यावर साल बांधावी. त्यामुळे साल मिटत नाही, प्रत खराब होत नाही.
- साल चढवलेल्या काड्या सावलीत ज्या ठिकाणी भरपूर प्रकाश आहे, अशा ठिकाणी उभ्या करून ठेवाव्यात. पाच ते सहा दिवसांनी काठ्यांवरून साल सोडून घ्यावी. त्यानंतर उन्हामध्ये १० ते १५ मिनिटे वाळवल्यानंतर मग हवाबंद डब्यात ठेवावी.
दालचिनी काढणी आणि उत्पादन
काढणीचे वर्ष आणि हंगाम ः झाड तोडून त्यापासून साल काढावी लागते. त्यासाठी लागवड केल्यापासून तिसऱ्या वर्षी नोव्हेंबर ते मे दरम्यान दालचिनीचे झाड तोडून साल काढावी. त्यानंतर चौथे वर्षाने झाड तोडणीस येत नाही. त्यानंतर मात्र पुढील प्रत्येक वर्षी झाडाच्या तयार फांद्या काढून त्याची साल काढता येते.
साल ः तिसऱ्या वर्षी ३५ ते ५० ग्रॅम वाळलेली साल मिळते. पाचव्या वर्षांपासून पुढे उत्पादनात वाढ होते. दहाव्या वर्षांपासून प्रतिझाड २०० ते २५० ग्रॅम वाळलेली साल मिळते. लागवड केल्यापासून सरासरी ६० ते ६५ वर्षे उत्पादन घेता येते.
खोड ः वापर इंधन म्हणून होतो किंवा खोड जर जाड असेल तर त्याचा उपयोग खेळणी बनविण्याकरिता केला जातो.
पाने ः झाडे तोडल्यानंतर फांद्यांवरची पाने अलग करावीत आणि ती सावलीत वाळवावीत. त्याचा तमालपत्र म्हणून उपयोग करता येतो किंवा सदर पानांपासून कारखान्यामध्ये तेल काढता येते. तेलाचा उपयोग लवंगाच्या तेलासारखा करता येतो. त्यामध्ये युजेनॉल हा घटक असतो.
काळा नागकेशर ः दालचिनी तोडण्यापूर्वी त्यावरती येणारी लहान फळे उन्हात वाळवावीत. त्याचा उपयोग काळा नागकेशर म्हणून मसाल्यामध्ये केला जातो.
- डॉ. वैभव शिंदे, ०२३५२-२५५३३१
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)

0 comments:
Post a Comment