नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान आणि रब्बीच्या पेरण्यांना झालेला उशीर ही संकटे असतानाही यंदाच्या पीक वर्षात अन्नधान्य उत्पादन विक्रमी दोन हजार ९१९.५ लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्य उत्पादन २.४ टक्क्यांनी वाढणार आहे, असे कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या दुसऱ्या पीक उत्पादन अंदाज अहवालातून मिळाली.
देशात सर्वाधिक उत्पादित होणारे आणि आहारातील मुख्य अन्न असलेल्या गहू आणि भाताचे उत्पादनही यंदा उच्चांकी पातळीवर पोचले आहे. यंदा सरकारने रब्बी हंगामात गहू उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत ४ टक्के वाढ होऊन एक हजार ४९३ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच, सरकारने सप्टेंबर महिन्यात व्यक्त केलेल्या एक हजार ४०५.७ लाख टन खरीप उत्पादनाच्या अंदाजात वाढ करून एक हजार ४२३.६ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
गहू उत्पादनातही वाढ
सरकारने गहू उत्पादनात २.५ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा गव्हाचे उत्पादन एक हजार ६२ लाख टनांवर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, मार्केटच्या अंदाजानुसार गव्हाचे उत्पादन एक हजार ८० लाख टन होईल. भाताचे उत्पादनही वाढणार असल्याचे सरकारने अहवालात म्हटले आहे. भाताच्या उत्पादनात एक टक्क्याने वाढ होऊन उत्पादन एक हजार १७५ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगामात भाताचे उत्पादन १४४ लाख टन झाले होते यंदा रब्बीत १५५ लाख टन भात होण्याचा अंदाज आहे.
कडधान्य उत्पादन २३० लाख टनांवर
देशात यंदा कडधान्य उत्पादन २३०.२ लाख टनांवर पोचेल, असे अहवालात नमूद केले आहे. गेल्यावर्षी कडधान्याचे उत्पादन २२०.८ लाख टनांवर पोचले होते. तर, यंदा रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या १३९.८ लाख टनांपेक्षा वाढून उत्पादन १५१.१ लाख टनांवर पोचेल. मात्र, खरीप हंगामातील उत्पादन गेल्यावर्षीच्या ८२.३ लाख टनांवरून कमी होऊन ७९.२ लाख टनांवर येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी हरभऱ्याचे ९९ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा त्यात वाढ होऊन ११२ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
तेलबिया ८ टक्के वाढ
सरकारने यंदाच्या पीक हंगामात तेलबिया उत्पादनात ८ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तेलबिया उत्पादन ३४२ लाख टन होईल. सोयाबीन उत्पादनाचा सुरुवातीचा १३५ लाख टनाचा अंदाज वाढवीत १३६ लाख उत्पादन होणार असल्याचे म्हटले आहे. मोहरी उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत घटणार आहे. गेल्यावर्षी मोहरीचे ९३ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा ९१ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.
देशातील पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज (दशलक्ष टनांत) (२०१९-२० अंदाज)
| पीक | २०१९-२० | २०१८-१९ | बदल |
| तृणधान्य | |||
| खरीप | १३४.४४ | १३३.४२ | ०.८ |
| रब्बी | १३४.४९ | १२९.७१ | ३.७ |
| कडधान्य | |||
| खरीप | ७.९२ | ८.०९ | (-२.१) |
| रब्बी | १५.११ | १३.९८ | ८.१ |
| तेलबिया | |||
| खरीप | २३.४४ | २०.६८ | १३.३ |
| रब्बी | १०.७५ | १०.८५ | (-०.९) |
| कापूस | ३४.८९ | २८.०४ | २४.४ |
| ताग | ९.३६ | ९.५० | (-१.५) |
| ऊस | ३५३.८५ | ४०५.४२ | (-१२.७) |
- कापूस लाख गाठी (एक गाठ-१७० किलो)
- ताग लाख गाठी (एक गाठ-१८० किलो

0 comments:
Post a Comment