प्रिमिक्सपासून सहजरित्या आणि जलद खाद्यपदार्थ बनविता येतात. प्रिमिक्स पदार्थ लोकप्रिय झाले आहेत त्यामुळे त्याची मागणी वाढू लागली आहे. प्रिमिक्स पदार्थ तयार करताना काही मापदंड पाळावे लागतात, प्रक्रियेदरम्यान विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पदार्थाची गुणवत्ता नियंत्रित राहण्यास मदत होते.
रेडी टू कुक (प्रिमिक्स)ची गुणवत्ता वाढवण्यासाठी पुढील मापदंड महत्त्वाचे आहेत.
- पदार्थामधील कणांचा आकार ७० ते ८० मायक्रॉन असावा.
- पदार्थांतील आर्द्रता ७ ते ९ टक्के पर्यंत असावी.
- पदार्थाची आम्लता ०.६ ते १.२ टक्के असावी.
प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी
- प्रक्रियेदरम्यान स्वच्छतेची काळजी घ्यावी.
- पॅकिंग करतांना हवाबंद पॅकिंग केल्यास त्याचा साठवण कालावधी वाढण्यास मदत होते.
- कच्च्या मालातून खडे निवडण्याची प्रक्रिया फार महत्त्वाची असते.
- प्रत्येक वेळी पदार्थ तयार केल्यानंतर संपूर्ण उपकरणे स्वच्छ करून घ्यावीत व त्यानंतरच दुसरे पदार्थ तयार करावेत. एका पदार्थाचा वास दुसऱ्या पदार्थाला लागू नये याची काळजी घ्यावी.
प्रकल्पासाठी लागणारी यंत्रे
- डिस्टोनेटर (खडे वेगळे करण्याचे यंत्र)
- ग्राइंडर (डाळ किंवा तांदूळ दळण्यासाठी)
- व्हायब्रो सिव (योग्य आकाराचे कण
- मिळवण्यासाठी चाळणे)
- ट्रे ड्रायर (आर्द्रता प्रमाणित ठेवण्यासाठी)
- रीबन मिक्सर (मिश्रण व्यवस्थित मिसळण्यासाठी)
- प्लॅनेटेरी मिक्सर पदार्थ व्यवस्थित एकजीव होण्यासाठी.
- पाऊचिंग मशीन (विविध आकारातील पाऊच तयार करण्यासाठी)
- वजन काटे
- तळण्यासाठी कढई, मोठे चमचे
प्रक्रियेसाठी येणारा खर्च
- जागा - ५००० चौरस फूट
- यंत्रे - ३५ ते ५० लाख
- इतर साधनांसाठी - १० लाख
- कुशल कामगार - १०
- कामगार- २५
इतर आवश्यक बाबी
कोणताही प्रक्रिया उद्योग व्यावसायिक स्तरावर सुरू करण्यापूर्वी परवाना, कंपनी रजिस्ट्रेशन, एफएसएसएआय प्रामाणिकरण, ट्रेडमार्क, पॅकिंग व लेबलिंग, औद्योगिक सुरक्षा, बार कोडींग इ. महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या उत्पादनाची विश्वासर्हता वाढण्यासोबतच पदार्थांचा ब्रॅण्ड नावारूपाला येण्यास मदत होते. हॅसेप प्रणालीद्वारे पदार्थाच्या गुणवत्तेची पडताळणी केली जाते.
रेडी टू कुक पदार्थ (प्रिमिक्स) तयार करण्यासाठी आवश्यक घटकांचे प्रमाण
गुलाब जामून मिक्स (प्रमाण टक्क्यांमध्ये)
- मैदा ः ४५.००
- सुजी ः ५.००
- तूप ः १२.००
- दूध पावडर ः ३५.५
- सायट्रिक आम्ल ः ०.५०
- खाण्याचा सोडा ः २.००
डोसा मिक्स (प्रमाण टक्क्यांमध्ये)
- मीठ ः ३.०७
- खाण्याचा सोडा ः २.००
- सायट्रिक आम्ल ः २.२८
- मेथी पावडर ः ०.४०
- सोडियम अॅसिटेट ः ०.०७
- तांदळाचे पीठ ः ६७.४
- उडीद डाळ पीठ ः २४.७८
खमण ढोकळा मिक्स (प्रमाण टक्क्यांमध्ये)
- मीठ ः ३.०४
- खाण्याचा सोडा ः २.००
- हिंग ः ०.९०
- सायट्रिक आम्ल ः २.०६
- बेसन ः ५४.००
- सुजी ः २३.००
- पिठी साखर ः १५.००
दही वडा मिक्स (प्रमाण टक्क्यांमध्ये)
- मीठ ः २.५०
- खाण्याचा सोडा ः २.१९
- जिरा पावडर ः ०.५०
- सायट्रिक आम्ल ः २.३२
- उडीद डाळ रवा ः ४७.२
- उडीद डाळ पीठ ः १८.२
- मैदा ः २२.००
- तूप ः ५.००
इडली मिक्स (प्रमाण टक्क्यांमध्ये)
- मीठ ः २.८५
- खाण्याचा सोडा ः १.६७
- मेथी पावडर ः ०.४५
- सोडियम ॲसिटेट ः ०.०७
- सायट्रिक आम्लः २.००
- तांदूळ रवा ः ६६.००
- उडीद डाळ पीठ ः २७.००
या प्रमाणेच रवा डोसा, ढोकळा, जिलेबी, कुल्फी, बासुंदी, राईस खीर, शेवई खीर, रवा इडली, उडीद डाळ वडा, मूग डाळ वडा, पकोडा, सांबर, रस्सम, उपमा. सुगंधी दूध मिक्स, जेली मिक्स इ. पदार्थही बनविता येतात.
राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७,
(लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ज्ञ आहेत.)

0 comments:
Post a Comment