शेवग्याच्या शेंगांचा समावेश मानवी आहारामध्ये मुख्यतः होत असला तरी त्याचा कोवळा पाला व फुले यांचाही कमी अधिक प्रमाणात वापर होतो. शेवग्याची लागवड ही बहुधा शेताच्या बांधावर किंवा परसात केली जाते. मात्र अलीकडे शेवग्याची शेतामध्येही लागवड वाढत आहे. शेवग्याच्या पानात प्रथिने आणि खनिज यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. जनावरांच्या वाढीसाठीही हा पाला अत्यंत उपयुक्त असून, त्याचा वापर फारसा होत नाही. गव्हाचा भुस्सा आणि शेवगा यांचे मिश्रण प्राण्यांकडून आवडीने खाल्ले जाते.
शेवग्याच्या पानातील पोषण तत्त्वे :
क्रूड प्रथिने- २३-२५%, पॉटॅशिअम- ०.२४%, कॅल्शिअम- ०.८%, फॉस्फरस- ०.३०%, मॅग्नेशिअम- ०.५%, सोडिअम- ०.२०%, तांबे- ८.७८ पीपीएम, झिंक- १८ पीपीएम, लोह- ४७० पीपीएम एवढे प्रमाण आढळते.
चाऱ्यासाठी योग्य शेवगा जाती – पीकेएम १ आणि पीकेएम २.
लागवड -
- शेवग्याची लागवड पावसाळ्याच्या सुरवातीला करावी. साधारणतः लोम किंवा चिकणमाती आणि ६.८ ते ७ च्या आसपास सामू असलेल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये ही झाडे चांगली वाढतात.
- लागवड ही वाफ्यांवर किंवा सऱ्यांवर केल्यास पाणी जास्त वेळ साचून मुळे सडण्याचे प्रमाण कमी होते.
- शेवगा चाऱ्यासाठी अनेक वर्ष वापरता येतो.
- लागवडीच्या पंधरा दिवस अगोदर १० ते १५ दिवस अगोदर ५ टन प्रति एकरी शेणखताची मात्रा द्यावी. जमीन व्यवस्थित करून घ्यावी, तसेच लागवडीच्या अगोदर सुपर फॉस्फेट एकरी ५५ किलो टाकावे.
- चांगल्या उगवणीसाठी बियाणे पाण्यात रात्रभर भिजत ठेवावीत. ३०×३० सेमी अंतरावर बियाण्याची लागवड करावी.
कापणी :
चाऱ्यासाठी पहिली कापणी ८० ते ९० दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या ४०-४५ दिवसांनी घेता येतात. वर्षाला साधारणतः ८ ते ९ कापण्या घेता येतात. हिरव्या चाऱ्याचे वार्षिक उत्पादन हेक्टरी ९० ते १०० टनांपर्यंत मिळते.
जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत :
- ज्या वेळी चाऱ्याची उपलब्धता कमी असेल, अशा वेळी कडब्याच्या कुट्टीसोबत देता येतो.
- प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेवग्याची वाळवलेली पाने जनावरांच्या खुराकात मिसळून देता येतात. त्यामुळे खुराकावरील खर्च कमी होण्यास मदत होते.
- शेळी आणि मेंढी यांच्याकडून शेवग्याचा हिरवा चारा कमी प्रमाणात खाल्ला जातो, त्यामुळे कुट्टी करून चारा उन्हात वाळवून घ्यावा. वाळलेला शेवगा पाला, मक्याचा भरडा आणि मीठ हे घटक ८०:१९:१ या प्रमाणात मिसळावेत. व्यवस्थित मिसळण्यासाठी ४ ते ५ किलो मळी (मोलॅसिस) प्रति १०० किलो मिश्रणात वापरली जाऊ शकते. मळीमुळे आहाराचा गोडवा वाढतो. शेळ्या मेंढ्यांकडून चारा जास्त प्रमाणात खाल्ला जातो.
फायदे :
- कमी पाणी असलेल्या ठिकाणीसुद्धा वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता शक्य.
- शेवग्याचे झाड चिवट असल्यामुळे मरतुकीचे प्रमाण कमी.
- मुबलक प्रमाणात चारा उत्पादन शक्य.
- जनावरांची प्रतिकारशक्ती वाढते.
- शेळ्या मेंढ्यांच्या वजनवाढीसाठी उपयुक्त.
- लसूण घासापेक्षा एकरी जास्त उत्पादन.
डॉ. महेश तांबे, ९४२०३८७४७२
(पशुपोषण विभाग, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली, उत्तर प्रदेश)

0 comments:
Post a Comment