औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता २५) मोसंबीची १३० क्विंटल आवक झाली. मोसंबीला किमान ६०० ते कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी ३५ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला किमान ६०० ते कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. अंजिराची आवक १४ क्विंटल, तर दर ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १६५ क्विंटल आवक झालेल्या कैरीला ७०० ते ९०० रुपये दर मिळाला. संत्र्यांची आवक १२ क्विंटल, तर दर १२०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २१० क्विंटल आवक झालेल्या टरबूजाचे दर ५०० ते ७०० रुपये राहिले.
खरबुजाची आवक १३५ क्विंटल, तर दर ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या चिंचेला ७ हजार ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बटाट्याची आवक ४०० क्विंटल, तर दर १००० ते १८०० रुपये राहिले. ७३ क्विंटल आवक झालेल्या द्राक्षाला १५०० ते ३००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ११२ क्विंटल, तर दर १००० ते १६०० रुपये राहिले. ५६१ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ४०० ते ७०० रुपये राहिले. फ्लावरची आवक ६५ क्विंटल, तर दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ११९ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला २०० ते ४०० रुपये दर मिळाला.
वांग्याची आवक १२ क्विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या गवारीला ८०० ते १००० रुपये दर मिळाला. काकडीची आवक ३५ क्विंटल, दर ४०० ते ५०० रुपये मिळाला. भेंडीची आवक ३५ क्विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल राहिला. कोबीची आवक ५५ क्विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये राहिला. १३ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना ३००० ते ४००० रुपयांचा दर मिळाला.
शेवगा ७०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल
३३ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. आंब्याची आवक ५३ क्विंटल, तर दर ७ हजार ते १२ हजार रुपये राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या पपईला १००० ते १५०० रुपये दर मिळाला. २० क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ४०० ते ६०० रुपये दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक ३२ क्विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या कारल्याचे दर ६०० ते १२०० रुपये राहिले. १७ क्विंटल आवक झालेल्या मक्याला ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment