गेल्या वर्षी हवामान बदलाचा विशेषतः पावसाचा परिणाम "तुऱ्याच्या" स्वरुपात दिसून आला. त्याचा उत्पादनाला काही प्रमाणात फटका बसला. यावर्षीही भारतीय हवामान विभागाने सरासरीइतका पाऊस पडण्याचा पहिला अंदाज दिला आहे. ऊस उत्पादक पट्ट्यामध्ये गेल्या वर्षीसारखा मोठा पाऊस येऊन उसाला तुरा येण्याची समस्या उद्भवू शकते.
ऊस पीक हे वर्षभर तग धरून राहणारे व उष्णकटिबंधात वाढणारे पीक. याच्या लागवडीसाठी साधारणतः खोल, पाण्याचा निचरा होणारी व ६.५ पीएच असणारी जमीन उपयुक्त ठरते. या पिकामध्ये जमिनीची आम्लता व क्षारता सहन करण्याची क्षमता आहे. म्हणूनच ५ ते ८.५ पीएच श्रेणी असलेल्या जमिनीमध्ये वाढ होते.
तसेच तिन्ही हंगामामध्ये येणारे पीक असल्याने हवामान घटकांचाही फारसा विपरीत परिणाम होत नाही. मात्र, गेल्या वर्षी हवामान बदलाचा विशेषतः पावसाचा परिणाम "तुऱ्याच्या" स्वरुपात दिसून आला. त्याचा उत्पादनाला काही प्रमाणात फटका बसला. यावर्षीही भारतीय हवामान विभागाने सरासरीइतका पाऊस पडण्याचा पहिला अंदाज दिला आहे. ऊस उत्पादक पट्ट्यामध्ये गेल्या वर्षीसारखा मोठा पाऊस येऊन उसाला तुरा येण्याची समस्या उद्भवू शकते. उसाला तुरा हा पिकाची पूर्ण वाढ ( परिपक्व) झाल्यावर येण्यास सुरुवात होते त्याचबरोबर हवामानातील घटकांमध्ये बदल झाल्यास तुरा लवकर येतो.
तुरा येण्यास हवामानातील कारणीभूत घटक
पाऊस
पावसाळ्यात अति पावसामुळे जमीनीचा ऱ्हास होऊ लागतो. पिकाला नत्राची कमतरता भासते किंवा उभ्या पिकामध्ये जास्त पाणी साचून राहिल्यास नत्राची उपलब्धता होत नाही. परिणामी पिकाची शाखीय वाढ खुंटते. तुरा लवकर व जास्त प्रमाणात येतो. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत ऊस लागवड केल्यास ऊसाला तुरा येतो.
प्रकाश कालावधी
ऊस पिकाला सलग दोन आठवड्याच्या आसपास बारा तासापेक्षा जास्त दिवसाचा सुर्य प्रकाश मिळाला तर तुरा येऊ लागतो.
तापमान
तापमानाचा विचार केला तर, २६ अंश सेल्सिअस दिवसाचे व रात्रीचे २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान तुरा येण्यास पोषक असते. मात्र, तापमान १७ अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाले तर तुऱ्याचे प्रमाण घटते.
आर्द्रता
वातावरणातील आर्द्रता सलग दोन आठवड्याच्या आसपास साधारणतः ६० ते ९० टक्के राहिल्यास तुरा येण्यास सुरुवात होते.
उपाययोजना
- शेतात साठणाऱ्या पाण्याची निचरा वेळच्या वेळी होईल, याकडे लक्ष द्यावी. तशी व्यवस्था करून ठेवावी.
- लागवड शिफारस केलेल्या हंगामात आणि वेळेत करावी.
- हंगामानुसार व कृषि परिस्थितीकी विभागानुसार शिफारस केलेल्या जातींची निवड व लागवड करावी.
- नत्राची मात्रा विभागून द्यावी.
- योग्य खताची मात्रा, योग्य वेळी,योग्य प्रमाणात द्यावी.
- लवकर पक्व होणाऱ्या जातींची तोडणी वेळेवर करावी.
- हवामान बदलाच्या माहिती नुसार शेतात विविध उपाययोजना करण्यासाठी कृषि विद्यापीठे यांचा हवामान सल्ल्याचा उपयोग करावा
संपर्क - प्रा. धनाजी सावंत, ०२१८५-२२७१९१
(सहाय्यक प्राध्यापक - कृषी हवामानशास्त्र, रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज, जि. सोलापूर.)

0 comments:
Post a Comment