जळगाव ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या कडब्याचे दर दबावात आहेत. आंतरराज्यीय वाहतूक रखडत सुरू आहे. शिवाय रब्बी हंगाम अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने कडबा मुबलक आहे. परिणामी, दर दबावातच आहेत.
मागील हंगामात मका कडब्याचे दर प्रतिएकर सात ते आठ हजार रुपये, असे होते. यंदा प्रतिएकर चार हजार रुपये दर आहेत. ज्वारीच्या कडब्याचे दरही प्रतिएकर पाच ते सहा हजार रुपये, असेच आहेत. बाजरीच्या कडब्याचे दरही प्रतिशेकडा दीड हजारांपर्यंत आहेत. मागील वर्षी ते तीन ते दोन हजार रुपये होते. रब्बी हंगामात हरभऱ्यापाठोपाठ मक्याची खानदेशात ५० हजार हेक्टरमध्ये, ज्वारीची सुमारे ४० हजार हेक्टरवर, तर बाजरीची १२ ते १३ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.
दुग्ध उत्पादनात आघाडीवरील धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, नवापूर, जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, पारोळा, जामनेर, रावेर या भागातही चारा मुबलक आहे. मध्य प्रदेश, गुजरातमध्ये कडब्याला मागणी असते. परंतु, या भागातील वाहतूक रखडत सुरू आहे.
दुग्ध व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका बसल्याने दुग्ध उत्पादकही अडचणीत आले आहेत. दुधाचे दर दबावात आहेत. यामुळे चाऱ्याच्या दरांनाही फटका बसला आहे. ग्राहक नसल्याने शेतातच कडबा पडून आहे. त्याची कुट्टी करणे शेतकरी टाळत आहेत. कारण, पाऊस आल्यास मोठे नुकसान होईल.

0 comments:
Post a Comment