Monday, May 18, 2020

कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करा

गाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज ठरविलेल्या वेळेत दूध काढावेत. दुधाच्या धारा पूर्णपणे काढाव्यात, अर्धवट काढू नयेत. कासेवर किंवा सडावर जखमा होऊ देऊ नयेत.पशूतज्ज्ञांच्या सल्याने उपचार करावेत.

कासदाह हा आजार गाई,म्हशींमध्ये दिसून येतो. व्यायल्यावर आणि विण्यापूर्वी १५ दिवस अगोदर हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. यामुळे दुधाळ जनावरांची कास कडक होते.

कारणे

  • गोठ्यातील अस्वच्छता
  • धारा काढणाऱ्या माणसाचे हात अस्वच्छ असल्यास
  • कास धुण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केल्यास
  • जनावरांचे दूध वेळेवर न काढल्याने किंवा अर्धवट काढल्यास

लक्षणे

  • आजारी जनावरांची कास घट्ट होते. दुधाच्या गाठी होतात.
  • दूध काढल्यानंतर रंग पिवळसर किंवा लालसर होतो.
  • कास कडक किंवा दगडासारखी होते. जनावरांस वेदना होतात. वेदना झाल्यामुळे जनावर कासेला हात लावू देत नाही.
  • जनावरांना ताप येतो, पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढते.
  • चारा व पाण्याचे कमी प्रमाणात सेवन करतात.
  • कासेमध्ये गाठी झाल्यास दूध येणे बंद होते. त्यानंतर सडातून फक्त पाणी येते.

रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी

  • धार काढताना जनावरे स्वच्छ जागी बांधावी.
  • दूध काढणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ असावेत व तो निरोगी असावा.
  • धार काढण्यापूर्वी जनावरांची कास पोटॅशिअम परमॅंगनेटच्या १ टक्के द्रावणाने स्वच्छ धुवून घ्यावी.
  • कासेवर किंवा सडावर जखमा होऊ देऊ नयेत.
  • जनावरांचे दूध दररोज ठरविलेल्या वेळेत काढावेत. दूध धारा पूर्णपणे काढाव्यात, अर्धवट काढू नयेत.
  • धार काढल्यानंतर जनावरास खाण्यास चारा किंवा वैरण द्यावी. त्यामुळे जनावर खाली बसत नाही. सडांची छिद्र बंद होण्यास लागणारा वेळ जनावर उभे असतानाच निघून जातो.

उपाययोजना 

  • बाधित जनावर त्वरित वेगळे बांधावे.
  • या जनावरांची धार सर्वात शेवटी काढावी.
  • रोग झालेल्या सडातील दूध पूर्णपणे पिळून काढावे. दूषित दूध वेगळे काढून नष्ट करावे.
  • कास व सड पोटॅशिअम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवावी.
  • पशुवैद्यकाच्या सल्याने उपचार करावेत.
  • आजारी जनावर पूर्णपणे बरे झाल्यानंतरच इतर जनावरांच्या गोठ्यात बांधावे.

संपर्क - प्रा. एस.ए. दळवे, ८३८१०६७८७२
(कृषी महाविद्यालय, आळणी, जि.उस्मानाबाद)

News Item ID: 
820-news_story-1589805501-915
Mobile Device Headline: 
कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करा
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Identify the diseases in animals and treat them
Author Type: 
External Author
के.ए. बुरगुटे, एस.ए. दळवे
Search Functional Tags: 
दूध, वैरण, उस्मानाबाद, Usmanabad
Twitter Publish: 
Meta Keyword: 
diseases, animals, animal husbandry
Meta Description: 
Identify the diseases in animals and treat them गाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज ठरविलेल्या वेळेत दूध काढावेत. दुधाच्या धारा पूर्णपणे काढाव्यात, अर्धवट काढू नयेत. कासेवर किंवा सडावर जखमा होऊ देऊ नयेत.पशूतज्ज्ञांच्या सल्याने उपचार करावेत.

0 comments:

Post a Comment