जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत, यामध्ये वाढ होत आहे. या आजाराचे निदान, उगम आणि नियंत्रण तात्काळ होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांचे आरोग्य (वन हेल्थ) ही संकल्पना अमलात आणावी लागणार आहे.
प्राण्यापासून मानवाला संक्रमित होणाऱ्या आजारांना प्राणिजन्य आजार (झुनोटिक डिसीज) म्हणतात. आजारी प्राणी आणि प्राणिजन्य उत्पादने यांचा संपर्क किंवा अप्रत्यक्ष दूषित पाणी किंवा अन्नाचे सेवन तसेच डास, ऊवा, पिसू, गोचीड यांसारख्या कीटकाद्वारे प्राणिजन्य आजाराचे संक्रमण होते. मागील दहा वर्षात संपूर्ण जगाने स्वाइन फ्लू, मंकी फीवर, टीक फीवर, बर्ड फ्लू या आजारांचा प्रादुर्भाव पाहिलेला आहे. आपण व्यवसाय म्हणून पशुपालन सुरू केले, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी एकत्र संगोपन करायला सुरुवात केली. संकरीकरणाच्या माध्यमातून प्राण्याचे उत्पादन वाढवले. जैव तंत्रज्ञानाचा वापर करून जनावरांत बदल घडवले. हवामान बदल जागतिकीकरणामुळे हे प्रमाण वाढत आहे. एकंदर प्राणी आणि मानव यांच्यातील नाते जसजसे बदलत जाईल, तसतसे प्राणिजन्य आजाराचे संकट वाढत जाणार आहे. पर्यावरणाची हानी आणि मानवी आरोग्य याचे संतुलन राखले नाही तर प्राणिजन्य आजारांची संक्रमणे वाढतील.प्राणी आणि मानवी आरोग्यासाठी सुधारित पर्यावरण संरक्षण ही संकल्पना रुजवावी लागेल. वाढत्या लोकसंख्येला जर योग्य अन्न पुरवठा होऊ शकला नाही, तर सहज उपलब्ध होणारे जंगली प्राणी हे मानवी खाद्य बनू शकते. गरिबीपाठोपाठ येणारी निरक्षरतादेखील फार मोठा अडथळा प्राणिजन्य आजाराच्या प्रसारामध्ये ठरत आहे.
भारतातील स्थिती
- देशांतर्गत विचार करता जनावरांच्या संख्येत जगात प्रथम क्रमांकावर आहोत. शेती उत्पादन आणि लोकसंख्येच्या बाबतीत आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. वाढती लोकसंख्या आणि त्यासाठी लागणारे अन्नधान्य उत्पादन व पशूजन्य उत्पादनाची गरज विचारात घेतली तर मोठ्या प्रमाणामध्ये असमतोल आहे.
- पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कत्तलखान्यात काम करणारे लोक, प्राणिजन्य आजारावर संशोधन करणारे तंत्रज्ञ मोठ्या प्रमाणामध्ये संक्रमित होऊ शकतात.
- वातावरणातील बदल, अनियमित पाऊस, वाढती दलदल, अस्वच्छता यामुळे रोगाचे संक्रमण वाढते.
‘सर्वांचे आरोग्य' संकल्पना
- जागतिक स्तरावर मान्यता पावलेल्या ‘सर्वांचे आरोग्य' (वन हेल्थ) ही संकल्पना अमलात आणावी लागेल. या संकल्पनेला एफएओ, ओआयई, डब्लूएचओ आणि युनिसेफ यांची मान्यता आहे. जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत. या आजारांचे निदान, उगम आणि नियंत्रण तात्काळ होणे गरजेचे आहे.
- सर्वांनी एकत्र येऊन मानव, प्राणी आणि पर्यावरण याचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे, कारण मानवी कल्याणासाठी पशू आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. सर्वांचे आरोग्य या संकल्पनेत वैद्यकीय, पशुवैद्यकीय आणि पर्यावरण तज्ज्ञांचे योगदान राहणार आहे.
- आजार आणि त्यांचे मानवातील संक्रमण यासाठी कारणीभूत असणारे पाळीव प्राणी, जंगली प्राणी, पक्षी यांचे आरोग्य हे तिघांनी एकत्र येऊन नियंत्रित करावे लागेल. यासाठी मूलभूत ज्ञान, तंत्रज्ञान आणि विचार यांची देवाण-घेवाण करावी. यामुळे देश आणि जागतिक पातळीवर जनावरांतील आरोग्य सुधारणा होईल. त्याचबरोबर पर्यावरण, जंगली प्राणी आणि सार्वजनिक आरोग्य यामध्येदेखील सुधारणा घडवून प्राणिजन्य आजारावर नियंत्रण ठेवता येईल.
- वन हेल्थ संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण, अशा प्रकारच्या विषयांचे वैद्यकीय, पशुवैद्यकीय, पर्यावरणविषयक शाखांमधील समावेश आणि जनजागृती करावी लागेल. वैद्यकीय क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आरोग्याबाबत लोकशिक्षण, प्रचार आणि प्रसिद्धीसाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.
- महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी (एनआयव्ही) या संस्था एकत्र येऊन सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेवर एकत्र येऊन नागपूर येथे प्रयोगशाळा उभारत आहेत.
(सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, सांगली)

0 comments:
Post a Comment