खनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन क्षमतेवर होतो. दूध उत्पादन क्षमता खालावते. त्यामुळे जनावरांच्या रोजच्या आहारात शिफारशीनुसार खनिज मिश्रणाचा वापर केल्यास दुष्परिणाम टाळता येतात.
जनावरांच्या वाढीमध्ये तसेच प्रजनन क्षमतेमध्ये खनिज मिश्रणे महत्त्वाची भूमिका बजावतात. जनावरांच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी खनिजे आवश्यक असतात. जनावरांच्या आहारात काही खनिजे जास्त प्रमाणात लागतात (उदा. कॅल्शिअम, स्फुरद, मॅग्नेशिअम इ.) तर काही खनिजे कमी/ अल्प प्रमाणात लागतात (उदा. क्रोमिअम, कोबाल्ट, कॉपर, फ्लोरिन, आयोडीन, लोह इ.)
खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये बऱ्याच समस्या उपलब्ध होतात. आपल्याकडे जनावरांच्या आहारात शास्त्रीय दृष्टिकोनाचा मोठा अभाव दिसून येतो. त्यामुळे जनावरांमध्ये कॅल्शिअम, स्फुरद, मॅग्नेशिअम, लोह, तांबे, इ. खनिजद्रव्यांची कमतरता असते. ज्याचा परिणाम जनावरांच्या वाढीवर तसेच प्रजनन क्षमतेवर होतो. उत्पादन क्षमता बरीच खालावते. त्यामुळे जनावरांच्या रोजच्या आहारात खनिज मिश्रणाचा वापर केल्यास दुष्परिणाम टाळता येतात. जनावरे निरोगी राहण्यास मदत मिळते. सर्व क्षारांच्या एकत्रित मिश्रणास खनिज मिश्रण म्हणतात.
खनिजांचा वापर
देशी जनावरांमध्ये साध्या खनिज मिश्रणाचा दररोज ३० ते ४० ग्रॅम वापर करावा. देशी वासरांमध्ये रोज ३० ग्रॅम खनिज मिश्रणाचा वापर करावा. बैलाच्या आहारात दररोज किमान २५ ग्रॅम; तर वळूंच्या (नैसर्गिक रेतनासाठी वापर) आहारात ३० ते ५० ग्रॅम वापर करावा.
खनिज मिश्रणाचा वापर
- आहारात केवळ वाळलेल्या चाऱ्याचा वापर असल्यास
- द्विदल चाऱ्याचा आहारात समावेश नसल्यास
- जनावरांचे दूध उत्पादन मुबलक असल्यास
- वासराचा वाढीचा दर कमी असल्यास
- जनावरांच्या शरीरावर वातावरण बदलाचा ताण असल्यास
चिलेटेड क्षार मिश्रण
चिलेटेड क्षार मिश्रण हे जास्त परिणामकारक ठरते. चिलेटेड क्षार मिश्रणामध्ये सूक्ष्मक्षारांची शरीरातील उपलब्धता वाढवलेली असते. यामुळे कमी क्षारमिश्रणामधून जास्त दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या जनावरांची शारीरिक गरज पूर्ण केली जाते. साध्या क्षार मिश्रणातील क्षारांची जनावरांच्या शरीरामध्ये उपलब्धता चिलेटेड क्षार मिश्रणापेक्षा कमी असते. चिलेटेड क्षार मिश्रणाचा वापर मुऱ्हा म्हशी, संकरित गायी, संकरित वासरांच्या आहारात, अशक्त जनावरांच्या आहारात करावा. चिलेटेड क्षार मिश्रणाचा दूध उत्पादन, वाढीचा दर यानुसार योग्य वापर करावा.
खनिज मिश्रणाचे महत्त्व
- उत्तम चयापचय प्रक्रियेसाठी महत्त्वाची भूमिका.
- वासरांमध्ये वाढीचा दर सुधारण्यासाठी मदत.
- रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.
- शरीरामध्ये शोषण झालेल्या पोषणद्रव्यांचा चांगल्या प्रकारे शरीरात वापर होण्यासाठी.
- जनावरांची प्रजनन क्षमता सुधारणा.
- दूध उत्पादन, प्रत सुधारण्यासाठी मदत.
- खनिज कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांना प्रतिबंध.
- त्वचा सतेज राहण्यास मदत.
- पचन क्षमतेमध्ये सुधारणा.
- शरीरातील रक्त, संप्रेरके, विकर चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत.
- कासेचे आरोग्य चांगले राहते. दात, हाडे, खुरे मजबूत होतात.
- डॉ. श्रद्धा राऊत ९२७०७०६००३
(पशुपोषण आहारशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

0 comments:
Post a Comment