नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन बाजार आवारामध्ये चालू वर्षीच्या टोमॅटो हंगामातील लिलावाला रविवारी (ता.१६) सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी ११ हजार १२५ क्रेट आवक झाली त्यास ८२१ रुपये प्रतिकेट दर मिळाला.
बाजार समिती सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते लिलावाला प्रारंभ झाला. यावेळी टोमॅटो उत्पादक शेतकरी नामदेव सावकार यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. दरवर्षी पिंपळगाव बसवंत बाजार समिती भारताच्या विविध राज्यातून टोमॅटो खरेदी साठी व्यापारी दाखल होत असतात. या वर्षी देखील कोरोनाचे सावट असताना देखील व्यापारी वर्ग दाखल येथे दाखल झाले आहेत.
बाजार समितीने टोमॅटो हंगाम सुरूच राहणार असल्याचे जनजागृती करत शेतकरी वर्गाला टोमॅटो लागवडीसाठी आवाहन केले होते. त्यानुसार यावर्षी देखील मोठ्या टोमॅटो लागवडी झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने शेतकरी व व्यापारी वर्गाच्या आरोग्याची काळजी घेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. टोमॅटो विक्रीसाठी निफाडसह येवला, चांदवड तालुक्यातील शेतकरी येत आहेत. सध्या बाजार समितीमध्ये ३० ते ३५ हजार क्रेटची आवक येत असून बाजार भाव ४११ ते ५५० इतका मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
या वेळी संचालक निवृत्ती धनवटे, रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे, नारायण पोटे, बापू पाटील, सुभाष होळकर, उद्धव निमसे, महेंद्र शिंदे, अरूण चव्हाणके, नंदु गांगुर्डे, संजय सिरसाठ, सचिव बाळासाहेब बाजारे यासह शेतकरी व्यापारी उपस्थित होते.
टोमॅटो हंगाम दर वर्षीप्रमाणेच होणार आहे. टोमॅटो विक्री झाल्यावर रोख रक्कम दिली जात असून शेतकरी वर्गाने टोमॅटो बाजार समितीमध्येच विक्रीसाठी आणावे.
-आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती

0 comments:
Post a Comment