Monday, August 17, 2020

सोलापुरात कोथिंबीर, वांग्याला उठाव

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथीसह बटाटा, वांगी, टोमॅटो यांना चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक तुलनेने कमी राहिली, तरी मागणी असल्याने दर मात्र तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथीची आवक रोज प्रत्येकी दोन ते पाच हजार पेंढ्यापर्यंत झाली. तर बटाटा आणि टोमॅटोची रोज १०० ते ३०० क्विंटलपर्यंत तर वांग्याची २० ते ५० क्विंटलपर्यंत आवक राहिली. आठवड्याभरात आवकेत सातत्य नव्हते. त्यात कमी-जास्त प्रमाण होत राहिले. तरी मागणी असल्याने दर तेजीत राहिले. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी १५०० ते २००० रुपये, मेथीला ७०० ते ११०० रुपये तर शेपूला ७०० ते १००० रुपये असा दर मिळाला.

त्याशिवाय बटाट्याला प्रतिक्विंटलला किमान १३०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, टोमॅटोला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर वांग्याला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरची, गवार, भेंडीचे दरही बऱ्यापैकी वाढले.

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, गवारीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये तर भेंडीला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.

कांदा दरात किंचित वाढ
कांद्याच्या आवकेत या सप्ताहात काहीशी घट झाली. कांद्याची सर्व आवक बाहेरील जिल्ह्यातूनच झाली. कांद्याची २० ते ३० गाड्या प्रतिदिन एवढीच आवक होती. पण या सप्ताहात कांदा दरात काहीशी सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये असा दर मिळाला. १०० ते २०० रुपयांच्या फरकाने दर वाढले.

News Item ID: 
820-news_story-1597675326-304
Mobile Device Headline: 
सोलापुरात कोथिंबीर, वांग्याला उठाव
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi In Solapur, pick up cilantro and eggplant
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
सोलापूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, टोमॅटो, कोथिंबिर, मिरची, गवा, भेंडी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In Solapur, pick up cilantro and eggplant
Meta Description: 
In Solapur, pick up cilantro and eggplant सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथीसह बटाटा, वांगी, टोमॅटो यांना चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक तुलनेने कमी राहिली, तरी मागणी असल्याने दर मात्र तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

0 comments:

Post a Comment