नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेवग्याची दर दिवसाला सात ते दहा क्विंटलची आवक होत असून प्रतिक्विंटलला चार ते पाच हजार रुपये दर मिळत आहे. गेल्या आठवडाभरात पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली असली तरी दरात मात्र तेजी होती.
नगर बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला साधारण ३२ ते ३५ क्विंटलची आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला एक हजार ते दोन हजार रुपयाचा दर मिळाला. वांगीची दर दिवसाला साधारण पंचवीस क्विंटलपर्यंत आवक होऊन दोन हजार ते तीन हजार, कोबीची ३५ ते ४० क्विटंलची आवक होऊन पाचशे ते बाराशे, काकडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन पाचशे ते एक हजार, गवारीची सात ते पंधरा क्विंटलची आवक होऊन चार हजार ते पाच हजार, घोसाळ्याची सात ते पंधरा क्विंटलची आवक होऊन दीड ते अडीच हजार, दोडक्याची पंधरा ते वीस क्विटलची आवक होऊन दीड ते तीन हजार, कारल्याची वीस ते तीस क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते अडीच हजार रुपयाचा दर मिळाला.
भेंडीची पंचवीस ते पस्तीस क्विंटलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार, वाल ची पाच ते दहा क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते तीन हजार, घेवड्याची पंधरा ते वीस क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते तीन हजार, बटाट्याची तीनशे ते साडेतीनशे क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते दोन हजार चारशे रुपयाचा दर मिळाला. लसूणाला चांगली मागणी राहिली. लसणाची येथे दररोज आठ ते बारा क्विंटलची आवक होत असून सात हजार ते पंधरा हजार रुपयाचा दर मिळत आहे.
भुईमूग शेंगाचीही चांगली आवक होत आहे. भुईमूग शेंगेला अडीच ते साडेतीन हजाराचा प्रती क्विंटलला दर मिळाला. लिंबाचे दर मात्र पडलेलेच होते. लिंबाला प्रती क्विंटलला पाचशे ते एक हजार रुपयाचा दर मिळत आहे. कोथिंबीर, मेथी, दुधी भोपळा, शेपू, पालक भाजीला मागणी राहिली. वाटाण्याची आवक होत असून सात ते आठ हजार रुपयाचा दर मिळत आहे असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

0 comments:
Post a Comment