Monday, August 3, 2020

नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात सुधारणा

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरात घेवडा, वांग्यांच्या दरात चांगली सुधारणा झाली. बटाट्यांची दर दिवसाला तीनशे ते चारशे क्विंटल आवक होत आहे. भुसारच्या आवकेत मात्र अजूनही फारसा फरक पडला नाही. फळांची आवकही जेमतेम आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याची दर दिवसाला पंधरा ते वीस क्विंटलची आवक होत आहे. प्रती क्विंटलला तीन हजार ते पाच हजार रुपयांचा, तर वांग्यांची दर दिवसाला  पस्तीस ते चाळीस क्विंटल आवक, तर दर दोन हजार ते चार हजारांच मिळत आहे.

शेवग्याची आठ ते पंधरा क्विंटलची आवक आहे. चार हजार ते पाच हजार रुपयाचा दर मिळत आहे. टोमॅटोची ३५ ते ४० क्विटंल आवक होत आहे. पाचशे ते दिड हजार रुपये, फ्लॉवरची ४५ ते ५५ क्विंटलची आवक होत  आहे. दर दिड हजार ते आडीच हजार, काकडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होत आहे. तर, दर पाचशे ते एक हजार, गवारीची चौदा ते वीस क्विंटलची आवक, तर दर चार हजार ते पाच हजार रुपयांचा मिळत आहे. 

दोडक्याची दर दिवसाला वीस ते पंचवीस क्विंटल आवक झाली. दर दोन हजार ते चार हजार, तर कारल्याची २४ ते ३० क्विंटलची आवक, दर दिड हजार ते आडीच हजार रूपये मिळाला. भेंडीची दर दिवसाला वीस ते पंचवीस क्विटंलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार, वालाची दहा ते पंधरा क्विंटल आवक होऊन दर दोन हजार ते तीन हजार, बटाट्याची तीनशे ते चारशे क्विंटलची आवक, तर दर दोन हजार ते दोन हजार चारशे रूपये मिळाला. 

लसणाची आवक बारा ते पंधरा क्विंटल झाली. दर पाच हजार ते दहा हजार मिळाला. हिरव्या मिरचीची पंचवीस ते तीस क्विंटल आवक, तर दर एक हजार ते दोन हजार रुपये, लिंबांची २२ ते ३० क्विंटल, तर दर पाचशे ते एक हजार रुपये, दुधी भोपळ्याची पंचवीस ते पस्तीस क्विंटल आवक, तर दर पाचशे ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल राहिले. मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर, करडीभाजी, कढीपत्ता, आले, मका कणसांनाही चांगली मागणी राहिली.

भुसारमध्ये ज्वारी, तूर, मुग, उडीद, बाजरी, हरभरा, गहू, गुळडागाची आवक झाली. सोयाबीनचीही काही प्रामणात आवक होत आहे. भुसारसह फळांची आवकही स्थिर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

News Item ID: 
820-news_story-1596457373-190
Mobile Device Headline: 
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात सुधारणा
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi Ghewda in the Nagar, improvement in eggplant prices
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नगर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, टोमॅटो, गवा, भेंडी, Okra, मिरची, तूर, उडीद, गहू, wheat
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Ghewda in the Nagar, improvement in eggplant prices
Meta Description: 
Ghewda in the Nagar, improvement in eggplant prices नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरात घेवडा, वांग्यांच्या दरात चांगली सुधारणा झाली.

0 comments:

Post a Comment