सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे. त्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात फक्त तीनच दिवस फळे आणि भाज्यांची होऊ शकली. त्यात मेथी, शेपू, कोथिंबिर या भाज्यांच्या दरांत काहिशी सुधारणा राहिली. तर, वांगी, टोमॅटो यांचे दर स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
सोलापुरात १७ ते २६ जुलैपर्यंत लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पण, त्यानंतरही पुढे २७ आणि २८ जुलै असे दोन दिवस बाजार समितीमध्ये व्यवहारास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे कोणतेच व्यवहार होऊ शकले नाहीत. पण, सप्ताहातील शेवटचे तीन दिवस २९, ३० आणि ३१ जुलै या दिवशी मात्र व्यवहार झाले. अद्यापही बाजार समितीमध्ये लिलावाला परवानगी नाही. त्यामुळे थेट शेतकरी-ग्राहक अशीच खरेदी-विक्री सुरु आहे. त्यातही भाज्यांचे दर काहिसे सुधारले.
भाज्यांची आवक प्रत्येकी १० ते १२ हजार पेंढ्यापर्यंत राहिली. पण, मागणी असल्याने उठाव मिळाला. मेथीला शंभर पेंढयासाठी ८०० ते १००० रुपये, शेपूला ६०० ते ८०० रुपये आणि कोथिंबिरीला ७०० ते १००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, टोमॅटो यांची आवक काहिशी कमीच राहिली. वांग्याची रोज ५ ते ७ क्विंटल आणि टोमॅटोची ५० ते ७० क्विंटल एवढीच आवक राहिली. पण, मागणी असल्याने दर स्थिर राहिले.
वांग्यांना सर्वाधिक २५०० रुपये
वांग्याला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, टोमॅटोला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ५० ते ६० क्विंटलपर्यंत आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment