पुण्यात ५ ते १५० रूपये किलो
पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२७) डाळिंबांची सुमारे १५० टन आवक झाली होती. यावेळी दर्जानुसार ५ ते १५० रुपये प्रतिकिलो दर होता. सध्या बाजारात जास्तप्रमाणात भगवा वाणाची आवक होत असून, गणेश आणि आरक्ता वाणांची तुलनेने नगण्य आवक होत असल्याचे आडतदार अतुल जाधव यांनी सांगितले.
गौरी पुजन आणि गणेशोत्सवामुळे मागणी वाढली होती. मात्र आता मागणी तुलनेने घटली असून, आणखी १५ दिवसांत मागणी वाढुन दर १० टक्क्यांपर्यंत वाढीचा अंदाज जाधव यांनी व्यक्त केला आहे. वाणानुसार किलोचे दर पुढीलप्रमाणे आरक्ता - १०-४०, गणेश -५-२५, भगवा २० -१५०
नगरमध्ये १ ते ६५०० रूपये प्रती क्विंटल दर
नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून डाळिंबांची बऱ्यापैकी आवक होत आहे. डाळिंबाला सध्या एक ते साडेसहा हजार रुपयाचा प्रती क्विंटल व सरासरी ३ हजार ७५० रुपयाचा दर मिळत आहे. सध्या बाजार समितीत दर दिवसाला सहाशे ते सातशे क्विंटलची आवक होत आहे, अशी माहिती बाजार समितीतून देण्यात आली.
जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. शिवाय शेजारच्या जिल्ह्यातूनही येथे डाळिंबांची आवक होत आहे. सोमवारी (ता. २४) चारशे दहा क्विंटलची आवक होऊन एक ते सहा हजार व सरासरी साडेतीन हजाराचा दर मिळाला. रविवारी (ता. २३) ६८६ क्विटंलची आवक झाली. एक हजार ते साडेसहा हजार व सरासरी तीन हजार सातशे रुपयांचा दर मिळाला.
शुक्रवारी (ता. २१) ७२० क्विंटलची आवक होऊन एक हजार ते सहा हजाराचा दर मिळाला. मंगळवारी (ता.१८) ८०५ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते पाच हजार व सरासरी तीन हजाराचा दर मिळाला. यंदा डाळिंबांवर तेल्या व अन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्याचा दराला फटका बसत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
सोलापुरात क्विंटलला सर्वाधिक ८००० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबांची आवक चांगली राहिली. शिवाय, मागणी असल्याने दरही तेजीत राहिले. डाळिंबाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ८००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची रोज १ ते २ टनापर्यंत आवक राहिली. डाळिंबांची सर्व आवक सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, माढा या स्थानिक भागातूनच झाली. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आवकेत चढ-उतार आहे. पण, या आठवड्यात त्यात सातत्य राहिले. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ४००० हजार रुपये आणि सर्वाधिक ८००० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही प्रतिदिन ५०० क्विंटल ते एक टनापर्यंत राहिली. तर, दर साधारण असेच प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी ३२०० रुपये आणि सर्वाधिक ८२०० रुपये असा दर मिळाला. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यातही दराची काहिशी अशीच परिस्थिती होती.
प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी ३४०० रुपये, सर्वाधिक ८५०० रुपये असा दर मिळाला. १०० ते २०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर काहिसे तेजीत राहिल्याचे सांगण्यात आले.
अकोल्यात डाळिंबाला क्विंटला ५०० ते ५५०० रुपये दर
अकोला ः येथील बाजारात गुरुवारी (ता.२७) डाळिंबांची ५०० ते ५५०० रुपयांदरम्यान विक्री झाली. सध्या बाजारात दुय्यम दर्जाचा डाळिंब अधिक येत आहे. त्यामुळे दर सुद्धा कमी मिळत आहेत. येथील बाजारात थोड्या प्रमाणात स्थानिकसह शिर्डी, बारामती व मराठवाड्यातून डाळिंबांची आवक होत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
बाजारात दररोज आठ ते दहा वाहनांची आवक होत आहे.
पावसाने उघाड देताच बाजारपेठेत डाळिंबाची आवक वाढू लागली आहे. गुरुवारी दुय्यम प्रतिचे डाळिंब ५०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. तर, १५० ग्रॅम वजनापेक्षा मोठे फळ असलेले चांगल्या दर्जाचे डाळिंब ५००० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकले गेले. किरकोळ बाजारात डाळिंबाची विक्री दुय्यम प्रतिसाठी ४० ते ७० रुपये किलोने आणि उच्च दर्जाचा डाळिंब १०० ते १२० रुपयांदरम्यान विक्री होत आहे.
परभणीत १००० ते ३००० रुपये दर
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे - भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २७) १००० क्रेटची (२०० क्विंटल) आवक होती. डाळिंबांना प्रतिक्रेटला २०० ते ६०० रुपये (प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये) दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आदी भागातून डाळिंबांची आवक होत आहे. गेल्या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी डाळिंबांची सरासरी ७०० ते १००० क्रेटची आवक झाली. त्यावेळी १५० ते ६०० रुपये प्रतिक्रेट दर मिळाले.
गुरुवारी (ता.२७) डाळिंबाची १००० क्रेट आवक झाली. घाऊक विक्रीचे दर प्रतिक्रेट २०० ते ६०० रुपये दर होते. तर, किरकोळ विक्री ३० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने सुरु होती, असे व्यापारी अब्दुल कादिर अब्दुल गफ्फार यांनी सांगितले.
सांगलीत १००० ते ५००० रूपये क्विंटल
सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात डाळिंबांची कमी-अधिक प्रमाणात आवक होत आहे. गुरुवारी (ता. २७) ९५ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते ५०००, तर सरासरी ३००० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार समितीत सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ आटपाडी यासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या भागातून डाळिंबांची आवक झाली. सध्या आंबिया भरातील डाळिंबांची आवक सुरू आहे. बुधवारी (ता. २६) डाळिंबांची ३४६ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते ५००० तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला, मंगळवारी (ता. २५) डाळिंबांची ७१ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते ५००० तर सरासरी ३५० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. सोमवारी (ता.२४) डाळिंबांची १७५ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते ५०००, तर सरासरी ३००० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
कोल्हापुरात किलोस १० ते ४० रुपये
कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांची दररोज ५० ते १०० कॅरेट इतकी आवक होत आहे. डाळिंबास किलोस १० ते ४० रुपये इतका दर मिळत आहे. सांगली, सोलापूर भागातून डाळिंबाची आवक होत आहे.
बाजार समितीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डाळिंबांच्या आवकेत २५ टक्क्यांनी वाढ झाली. दरात ही किलोस १० रुपयांनी वाढ होती. गणेशोत्सवाच्या प्रारंभी २१ व २२ ऑगस्ट रोजी दररोज चारशे ते पाचशे कॅरेट इतकी आवक झाली. गेल्या दोन दिवसांत डाळिंबांची आवक कमी झाली आहे.
नाशिकमध्ये क्विंटलला ३०० ते ६०५० रुपये
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता.२६) डाळिंबांची आवक २३६६ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ३०० ते ६०५० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
सप्ताहात फळांमध्ये डाळिंब आवक सर्वाधिक आहे. गणेशोत्सवात मागणी असल्याने दर टिकून असल्याचे पाहायला मिळाली. मात्र होणारी आवक कमी जास्त असल्याने मागणीनुसार दर मिळत आहेत. मंगळवारी (ता.२५) डाळिंबांची आवक २२१७ क्विंटल झाली. त्यास ३०० ते ७५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रूपये होता. सोमवारी (ता.२४) डाळिंबांची आवक २९०९ क्विंटल झाली. त्यास ३२५ ते ८००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० होता.
रविवारी (ता.२३) डाळिंबांची फळ बाजार बंद असल्याने आवक झाली नाही. शनिवारी (ता.२२) आवक २७१८ क्विंटल झाली. त्यावेळी ३०० ते ६५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४३७५ होता. शुक्रवारी (ता.२१) बाजार समितीने संप पुकारला. त्यामुळे कामकाज बंद राहिले. त्यामुळे डाळिंबांची आवक झाली नाही.
जळगावात २००० ते ३००० रुपये दर
जळगाव (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२७) डाळिंबांची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २००० ते ३०००, असे होते. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड, नाशिक आदी भागातून होत आहे. दर स्थिर आहेत.
औरंगाबादमध्ये १००० ते २००० रूपये क्किंटल
औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२७) डाळिंबांची ८५ क्विंटल आवक झाली. या डाळिंबाला १००० ते २००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये २० ऑगस्टला ७५ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांचे दर ५०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल होते. २२ ऑगस्ट ११० क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांला ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. २३ ऑगस्टला डाळिंबांची आवक ९२ क्विंटल, तर दर ५०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल राहिले.
२४ ऑगस्टला ९० क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांना ८०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. २५ ऑगस्ट रोजी १०४ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांचे दर १००० ते २००० रुपये प्रति क्विंटल राहिले. २६ ऑगस्टला ६५ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

0 comments:
Post a Comment