Thursday, August 27, 2020

अकलूजचा जनावरे बाजार बंदच

अकलूज, जि. सोलापूर : कोरोना प्रादुर्भावामूळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या जनावरे बाजारामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोट्या व्यावसायिकांसह शेतकरी आणि व्यापाऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे. जनावरांचे बाजार लवकरात लवकर सुरू करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. 

अकलूज बाजार समितीच्या आवारात जनावरांचा मोठा बाजार भरला जातो. दर सोमवारी भरणाऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. मार्चमध्ये `कोरोना`च्या प्रादुर्भावामुळे आठवडे बाजार व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले. अकलूज व परिसरात २०० पेक्षा अधिक जनावरांचे व्यापारी आहेत. यातील अनेक व्यापारी स्वतःची रोख रक्कम गुंतवणूक करून जनावरांची खरेदी करतात. जादा किंमत मिळताच विकतात नेहमी जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांत खरेदी केलेली जनावारे विकली जातात. त्यामुळे खरेदी केलेली जनावरे जास्त दिवस सांभाळावी लागत नाहीत.

परंतु, लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपूर्वी विकत घेतलेली जनावरे अजूनही विकता आली नाहीत. त्यांना चारा पाणी करणे अवघड झाले आहे.  काही व्यापाऱ्यांनी उपजीविकेसाठी बांधकाम करणाऱ्यांच्या (सेंट्रिंग) हाताखाली, तर काहींनी चालक म्हणून, तर काहींनी चक्क मोलमजूरी करण्यास सूरू केली आहे.

एकीकडे व्यापाऱ्यांची ही अवस्था असताना शेतकऱ्यांची अडचणही वाढली आहे. अनेक छोट्या शेतकऱ्यांकडे गाई, म्हैस याबरोबरच शेळ्या, मेंढ्या, बोकड, कोंबड्या असतात. काही शेतकऱ्यांना त्याची खरेदी करावयीच असते, काहींना विक्री करावयाची असते, पण, बाजारच बंद असल्याने शेतकऱ्यांचीही कोंडी झाली आहे. 

प्रतिक्रिया
जनावंराचा बाजार सुरू करण्यास बाजार समिती सकारात्मक आहे. अकलूज बाजार समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी दक्ष असते. परवानगी दिल्यास कोरोनाबाबतची सर्व काळजी घेऊन बाजार सूरू करण्यास तयार आहोत. 
- मदनसिंह मोहिते पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज 

माझ्या कुटुंबासह माझ्याकडे असणाऱ्या कामगारांची कुटुंबे अवलंबून आहेत. आज माझ्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न असून कामगारांचे काय करायचे, हा प्रश्न आहे. 
- बाळासाहेब भोळे, व्यापारी, अकलूज.

News Item ID: 
820-news_story-1598540483-557
Mobile Device Headline: 
अकलूजचा जनावरे बाजार बंदच
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Farmer Agricultural News cattle market closed due to cororna Solapur Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
सोलापूर, कोरोना, व्यवसाय, बाजार समिती, व्यापार, गुंतवणूक
Twitter Publish: 
Meta Keyword: 
cattle market corona lock down Akluj Solapur farmers
Meta Description: 
cattle market closed due to cororna अकलूज, जि. सोलापूर : कोरोना प्रादुर्भावामूळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या जनावरे बाजारामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोट्या व्यावसायिकांसह शेतकरी आणि व्यापाऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे.

0 comments:

Post a Comment