Sunday, August 23, 2020

टोमॅटो साठ दिवस टिकविणे होणार शक्य

पुणेः टोमॅटोच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होऊन, दर घसरल्यानंतर माल फेकून देण्याची वेळ आता येणार नाही. टोमॅटोची टिकवण क्षमता आता ६० दिवसांपर्यंत वाढविणे शक्य होणार आहे. यासाठी भाभा अणू संशोधन केंद्र आणि पणन मंडळाच्या पुढाकारातून संशोधन आणि प्रयोग सुरु होणार आहे. 

भाभा अणू संशोधन केंद्राच्या अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाच्या वतीने हे संशोधन सुरु होणार असून, यासाठी पणन मंडळाच्या वाशी येथील विकिरण केंद्रात प्रयोग केले जाणार आहेत. विकिरण सुविधा आणि अन्य तंत्रज्ञानाद्वारे टोमॅटोवर प्रक्रिया केली जाणार असून, या प्रक्रियेद्वारे टोमॅटोची टिकवण क्षमता ६० दिवसांपर्यंत वाढणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबतचे पत्र भाभा अणू संशोधन केंद्राचे सहसंचालक डॉ. एस.के.घोष यांनी पणन मंडळाचे कोकण विभागाचे उप सरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांना देण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पावर भाभा अणू केंद्राचे अन्न प्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. एस गौतम आणि सचिन हजारे काम करणार आहेत. 

टोमॅटो खाल्याने कमी होऊ शकतो लठ्ठपणा; जाणून घ्या फायदे

टोमॅटो सारख्या अति नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आता भाभा अणू संशोधन केंद्र आणि पणन मंडळाच्या वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात संशोधन आणि प्रयोग करण्यात येणार आहेत. या प्रयोगांतून काढणीनंतर ६० दिवसांपर्यंत टोमॅटोची टिकवण आणि साठवणूक क्षमता वाढणार आहे. हा प्रयोग शेतकरी आणि प्रक्रिया उद्योगांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पणन मंडळाचे विकिरण सुविधा केंद्र विनामूल्य संशोधनासाठी उपलब्ध करुन दिले आहे.
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ 

‘‘टोमॅटोची टिकवण क्षमता वाढण्यासाठी होणारे संशोधन स्वागतार्ह आहे. नारायणगांव (ता.जुन्नर) उपाबाजारातुन संपूर्ण देशात टोमॅटो पाठविला जातो. सध्याच्या परिस्थितीमध्ये वाहतुकीमध्ये टोमॅटो खराब होण्याचा धोका आहे. हे संशोधन प्रत्यक्षात आल्यावर आम्ही नारायणगांव उपबाजारात विकिरण सुविधा उभारण्याचा आमचा प्रयत्न राहील. टोमॅटो बरोबर इतर भाजीपाल्याची देखील टिकवण क्षमता वाढीसाठी संशोधन व्हावे.
- संजय काळे, सभापती, जुन्नर (जि. पुणे) बाजार समिती



0 comments:

Post a Comment