Monday, August 24, 2020

लॉकडाऊननंतर सणानिमित्त नांदेड फूलमार्केट सजले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड फूल मार्केट तब्बल पाच महिन्यानंतर सुरू झाले. परंतु वाहतुकीतील निर्बंधांमुळे अन्य जिल्हे, तेलगंणा राज्यातून होणारी आवक थांबली. मात्र, स्थानिक परिसरातून मार्केटमध्ये विविध फुलांची आवक होत आहे.

गणेशोत्सव, गौरीसणानिमित्त मागणी वाढल्यामुळे नांदेड फूल मार्केटमध्ये विविध फुलांच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे फुलांचे क्षेत्र कमी राहिल्याने आवक कमी आहे. साहजिकच दरात तेजी आल्यामुळे फूल उत्पादकांमध्ये समाधान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड फूल मार्केट तब्बल पाच महिन्यानंतर सुरू झाले. परंतु वाहतुकीतील निर्बंधांमुळे अन्य जिल्हे, तेलगंणा राज्यातून होणारी आवक थांबली. स्थानिक परिसरातून आवक आहे. नांदेड, मुदखेड, उमरी, अर्धापूर तालुक्यातील गावांमधून मार्केटमध्ये विविध फुलांची आवक होत आहे. यात शिर्डी गुलाब, डच गुलाब, देशी गुलाब, गलांडा, लिली, झेंडू, मोगरा, निशिगंध, काकडा, जरबेरा, बिजली, शेवंती, पौर्णिमा आदींचा समावेश आहे.

कोरोना संकटात अनेक शेतकऱ्यांनी फूलपिकांखालील क्षेत्र कमी केले. विशेषतः झेंडू बियाण्याची विक्री तुलनेने कमी झाली. रोपावाटिकाधारकांनीही रोपे तयार केली नाहीत. झेंडूची आवक खूप कमी आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळेही नुकसान झाले.

सध्याचे दर
गणेश उत्सव, गौरी सणासाठी चार दिवसांपासून विविध प्रकारची फुले, फळे, दूर्वा, आघाडा आदींना मागणी वाढली आहे. सोमवारी (ता. २४) झेंडूची सहा क्विंटल आवक होऊन घाऊक विक्रीचे दर ४० ते ४० रुपये तर किरकोळ दर १०० ते १२० रुपये किलो होते. शिर्डी गुलाबाची दररोज सरासरी १० ते १२ क्विंटल आवक आहे. चार दिवसापूर्वी या गुलाबाचे दर प्रति किलो ५० ते ६० रुपये होते. त्यात सुधारणा होऊन सध्या ते ७० ते ८० रुपयांपर्यंत पोचले आहेत. डच गुलाबाचे दर प्रति बंडल (२० नग) ५० ते ६० रुपये होते. आता ते १०० त १५० रुपयांपर्यंत वधारले आहेत. निशिगंधाची दररोज एक क्विंटल आवक होत असून प्रति किलो १५० ते २०० रुपये दर मिळत आहे. पिवळ्या लिलीला ४० ते ५० रुपये प्रति पेंडी दर आहे.

प्रतिक्रिया....
फुलांचे उत्पादन सध्या कमी मिळत आहे. परंतु गेल्या चार दिवसांपासून मागणी वाढल्याने लिलीच्या बंडलच्या दरात पाचपट वाढ झाली आहे.
- अमोल सावंत, शेतकरी, मालेगाव, जि.नांदेड.

दररोज २० त २५ किलो गुलाब उपलब्ध होत आहेत. दोन दिवसांपासून शिर्डी गुलाबाचे दर वाढले आहेत. त्याचा फायदा होत आहे.
- दिगंबर बुलबुले, नागठाणा, ता.उमरी

पाच महिने मार्केट बंद होते. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक उत्सव, समारंभावर बंधने
असल्यामुळे फुलांना तुलनेने मागणी कमी होती. परंतु गौरी-गणपती उत्सवामुळे दरांत तेजी आली आहे ही समाधानाची बाब आहे.

- करीमखान, फूल व्यापारी, नांदेड

News Item ID: 
820-news_story-1598271029-313
Mobile Device Headline: 
लॉकडाऊननंतर सणानिमित्त नांदेड फूलमार्केट सजले
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi Nanded Flower Market started again after lockdown for the ganpati festival
Author Type: 
Internal Author
माणिक रासवे
Search Functional Tags: 
कोरोना, Corona, नांदेड, Nanded, गणेशोत्सव, पूर, Floods, गुलाब, Rose, झेंडू, व्यापार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nanded, Flower Market, lockdown, ganpati festival
Meta Description: 
Nanded Flower Market started again after lockdown for the ganpati festival कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड फूल मार्केट तब्बल पाच महिन्यानंतर सुरू झाले. परंतु वाहतुकीतील निर्बंधांमुळे अन्य जिल्हे, तेलगंणा राज्यातून होणारी आवक थांबली. मात्र, स्थानिक परिसरातून मार्केटमध्ये विविध फुलांची आवक होत आहे.

0 comments:

Post a Comment