औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात मुगाची आवक सुरू झाली. सततच्या पावसामुळे भिजलेला मूग बाजारात आला. त्यामुळे त्याला निर्धारित हमीदर मात्र मिळू शकला नाही, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान दोन वेळा नव्या मुगाची आवक झाली. मुगाचा हमी दर ७१९६ रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. आवक अत्यल्पच असलेल्या मुगाचे दर हमीदराच्या आतच राहिले. २० ऑगस्ट रोजी ३ क्विंटल आवक झालेल्या मुगाला ३५०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. २१ ऑगस्ट रोजी १७ क्विंटल आवक झाली. त्यावेळी ३५०० ते ५३०० रुपये दर मिळाला.
बाजरीची गत आठवडाभरात ३ वेळा आवक झाली. १७ ऑगस्ट रोजी १४८ क्विंटल आवक झालेल्या बाजरीला ११०० ते १३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. २० ऑगस्ट रोजी ८२ क्विंटल आवक झालेल्या बाजरीचे दर ११०० ते १२७० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २१ ऑगस्ट रोजी १२२ क्विंटल आवक झाली. त्यावेळी बाजरीला ११०० ते १२५० रुपये दर मिळाला.
ज्वारीची १७ ऑगस्ट रोजी २१ क्विंटल आवक झाली. तिला १५५० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २० ऑगस्ट रोजी १४ क्विंटल आवक झालेल्या ज्वारीचे दर १५०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल राहिले. २१ ऑगस्टला ५ क्विंटल आवक झालेल्या ज्वारीला १३०० ते १८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.
गहू १६०० ते १७५० रुपये क्विंटल
गव्हाची १७ ऑगस्ट रोजी ३२ क्विंटल आवक झाली. त्याचे दर १६०० ते १७५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० ऑगस्ट रोजी १२६ क्विंटल आवक झालेल्या गव्हाला १६०० ते १६५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. २१ ऑगस्टला ७६ क्विंटल आवक झालेल्या गव्हाचे दर १५५० ते १८७५ रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

0 comments:
Post a Comment