नगर ः जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून कांद्याच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. बुधवारी झालेल्या बाजार समित्यामधील लिलावात क्विंटलमागे पाचशे ते सहाशे रुपये प्रतीक्विंटलमागे दर वाढले. चांगल्या प्रतीच्या कांद्याला दोन हजार दोनशे ते दोन हजार ४०० रुपयापर्यंत दर मिळाला. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेतनंतर कांदा दरात वाढ होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला.
जिल्ह्यामधील नगरसह घोडेगाव, पारनेर, राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपुर, अकोले बाजार समितीत गेल्या आठ दिवसापासून कांदा दरात सुधारणा होत आहे.
बुधवारी घोडेगाव येथे झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रती क्विंटलला २३०० रुपयापर्यंत दर मिळाला. चांगल्या प्रतीच्या कांद्याला श्रीरामपूर बाजार समितीत १९०० ते २४०० रुपये, तर गोल्टी कांद्याला १२०० ते १८०० रुपयांचा दर मिळाला. पारनेर बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला १२०० ते २१०० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

0 comments:
Post a Comment