Thursday, August 20, 2020

राज्यात ढोबळी मिरची १००० ते ५००० रूपये क्विंटल

नगरमध्ये दीड ते अडीच हजार रुपये क्विंटल 
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला २३ ते २५ क्विंटलची आवक होत आहे. गुरूवारी(ता.२०) २३ क्विंटलची आवक झाली.तिला प्रती क्विंटलला दीड हजार ते आडीच हजार व सरासरी २ हजार रुपयांचा दर मिळाला.  नगर कृषी उत्पन्ना बाजार समितीत नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातून ढोबळी मिरचीची आवक होत आहे. मंगळवारी (ता. १८) २२ क्विंटलची आवक होऊन प्रती क्विंटल दोन हजार ते तीन हजारांचा दर मिळाला. रविवारी (ता. १६) २२ क्विंटलची आवक झाली. दर दीड हजार ते  तीन हजार रूपये मिळाला. शुक्रवारी (ता. १४) २० क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते साडेतीन हजारांचा दर मिळाला. गुरुवारी (ता.१३) २२ क्विंटलची आवक होऊन दोन ते साडेतीन हजारांचा दर मिळाला. ढोबळी मिरचीच्या दराज सतत चढ-उतार होत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

पुण्यात १८० ते २५० रूपये प्रति दहा किलो
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२०) सिमला मिरचीची सुमारे ४० टन आवक झाली. तिला दहा किलोला १८० ते २५० रुपये दर होता. सध्याची होणारी आवक इंदापूर, बार्शी, सांगोला परिसरातून होत आहे. तर, कोरोना टाळेबंदीनंतर शहरातील व्यवहार सुरळीत होऊ लागल्याने आणि हॉटेल देखील सुरु होत असल्याने दरात सुधारणा होत आहे, असे सिमला मिरचीचे प्रमुख आडतदार अमोल घुले यांनी सांगितले.

गेल्या चार दिवसांतील आवक आणि दर

दिनांक आवक (क्विंंटल) दर (रुपये)
१९ १८९ १५००-२५०० 
१८ ३८९ १५००-२५०० 
१७ ४८७ १०००-२००० 
१६ २८३ १५००-३०००

औरंगाबादमध्ये १००० ते २००० रूपये दर
औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) ढोबळी मिरचीची २१ क्विंटल आवक झाली. या ढोबळ्या मिरचीला १००० ते २००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. औरंगाबाद बाजार समितीमध्ये ८ ऑगस्ट रोजी ढोबळी मिरचीची १५ क्विंटल आवक झाली. त्यावेळी २००० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. १३ ऑगस्ट रोजी आवक १२ क्विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १५ ऑगस्ट रोजी तीन क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला ३००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची १६ ऑगस्ट रोजी १७ क्विंटल आवक झाली. तर, दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १७ ऑगस्ट रोजी आवक चार क्विंटल झाली. दर १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. १९ ऑगस्ट रोजी आठ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला १५०० ते २००० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ३४४० ते ५००० रुपये
नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१९) ढोबळी मिरचीची आवक १०० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल किमान ३४४० ते कमाल ५००० रुपये, असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४१९० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. आवक सर्वसाधारण आहे. मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे. मंगळवारी (ता. १८) रोजी ढोबळी मिरचीची आवक १०५ क्विंटल झाली. तिला ४०६० ते ७५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५९४० रूपये होता. सोमवारी (ता.१७) ढोबळी मिरचीची आवक १४५ क्विंटल झाली. तिला २२५० ते ४६२५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० होता. रविवारी (ता.१६) आवक १३६ क्विंटल झाली. त्यावेळी ३१२५ ते ५००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४०६२ होता. शनिवारी (ता.१५) आवक ९४ क्विंटल झाली. तिला २५०० ते ४३७५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३४४० होता. शुक्रवारी (ता.१४) ढोबळी मिरचीची आवक १२७ क्विंटल झाली. तिला २५०० ते ४२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३७५ होता. गुरूवारी (ता.१३) ढोबळी मिरचीची आवक १०८ क्विंटल झाली. तिला १८७५ ते ३८७५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २७५० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत ढोबळी मिरचीची आवक सर्वसाधारण असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार दरामध्ये चढ- उतार होत आहे.

कोल्हापुरात दहा किलोस १५० ते ४०० रूपये दर
कोल्हापूर येथील बाजार समितीत ढोबळी मिरचीची ९०० ते १००० पोत्यांची आवक होत आहे. ढोबळी मिरचीस दहा किलोस १५० ते ४०० रुपये दर मिळत आहे. बाजार समितीत आणि स्थानिक गावासह सांगली भागातूनही ढोबळी मिरचीची आवक होते. गेल्या पंधरवड्यापासून बाजार समितीत ढोबळी मिरचीची आवक वाढली आहे. मागणीत फारशी वाढ नसल्याने दर स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. जिल्ह्याच्या भाजीपाला पट्ट्यातून जादा प्रमाणात ढोबळी मिरचीची आवक होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. १००० पोती इतकी आवक होत आहे. ढोबळी मिरचीस दहा किलोस १५० ते ४०० रुपये दर मिळत आहे.

सांगलीत दहा किलोस २०० ते २५० रूपये दर
सांगली येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. २०) ढोबळी मिरचीची १५० पिशवी (एक पिशवी १० ते १२ किलोची) आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात गेल्या चार, पाच दिवसांपूर्वी पाऊस झाला. त्यामुळे ढोबळी मिरचीची आवक कमी झाली होती. मंगळवारपासून तिच्या आवकेत वाढ झाली आहे. शिवाजी मंडईत ढोबळी मिरचीची आवक, मिरज, आष्टा, दुधगाव, तुंग, बावची, कवठेपिरान, यासह अन्य भागातून होत आहे. बुधवारी (ता. १९) ढोबळी मिरचीची १२० पिशव्यांची आवक झाली. त्यावेळी प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. १८) ढोबळी मिरचीची १०० पिशव्यांची आवक झाली. त्यावेळी प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. १७) ढोबळी मिरचीची ९० पिशव्यांची आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस २७० ते ३२० रुपये असा दर मिळाला. पावसाने हजेरी लावली नाही, तर ढोबळी मिरचीची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली.

परभणीत २००० ते २५०० रूपये क्विंटल
परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे - भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २०) ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक झाली. ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर परिसरातून तसेच नाशिक जिल्हा, कर्नाटकातील बेळगाव येथून ढोबळ्या मिरचीची आवक होत आहे. गत महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ढोबळ्या मिरचीची ८ ते १० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल सरासरी २००० ते ४००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२०) ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होती. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

News Item ID: 
820-news_story-1597948288-532
Mobile Device Headline: 
राज्यात ढोबळी मिरची १००० ते ५००० रूपये क्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Capsicum rate between 1000 to 5000 per Quintal in Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
बळी, Bali, ढोबळी मिरची, capsicum, मिरची, नगर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, पुणे, इंदापूर, पूर, Floods, हॉटेल, औरंगाबाद, Aurangabad, कोल्हापूर, सांगली, Sangli, व्यापार, ऊस, पाऊस, परभणी, Parbhabi, नाशिक, Nashik, कर्नाटक, बेळगाव
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Capsicum rate between 1000 to 5000 per Quintal in Maharashtra
Meta Description: 
Capsicum rate between 1000 to 5000 per Quintal in Maharashtra राज्यात ढोबळी मिरची १००० ते ५००० रूपये क्विंटल

0 comments:

Post a Comment