नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहाच्या तुलनेत लसणाची आवक साधारण आहे. दरांत वाढ झाली आहे. आवक १४१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५०० ते ११००० असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक ९०८४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५० ते ६७५ दर मिळाला. बटाट्याची आवक ४५७३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २०५० ते २६०० दर होते. आल्याची आवक ३२६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५५०० ते ८००० दर
मिळाला.
सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाली. त्यामुळे बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ४३०२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १९०० ते ३००० दर मिळाला. तर, घेवड्याला प्रतिक्विंटल ११०० ते २००० दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ११२८ क्विंटल झाली. मागणी सर्वसाधारण असल्याने दर स्थिर होते. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००, तर ज्वाला मिरचीला प्रतिक्विंटल १५०० ते २३०० दर मिळाला. भुईमूग शेंगांची आवक ९३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ३५०० दर मिळाला.
फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १७५ ते ४५०, वांगी २२५ ते ४००, फ्लॉवर ५० ते १४० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. कोबीला ६० ते १२० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची २०० ते ३५० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ८० ते २२०, कारले १२० ते ३००, गिलके १०० ते २५०, असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला ८० ते ३७५, लिंबू १२० ते २५०, दोडका ३०० ते ७५० असे प्रति २० किलोस दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १२०० ते ११८००, मेथी २००० ते ७५००, शेपू १२०० ते ३०००, कांदा पात २५०० ते ६०००, पालक २५० ते ५२५, तर पुदिन्याला ८० ते १९० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले.
केळी ५५० ते ११०० रूपये क्विंटल
फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबांची आवक १२ हजार ८५२ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४०० ते ४५०० व मृदुला वाणास प्रतिक्विंटल ४०० ते ७५०० दर मिळाला. केळीची आवक ८५० क्विंटल झाली. तिला ५५० ते ११०० रूपये प्रती क्विंटल मिळाला. पपईची आवक २० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते २००० दर मिळाला. ओल्या नारळाची आवक ६०५ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मोसंबीची आवक २२० क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८५० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. दशहरी आंब्याची आवक ५० क्विंटल झाली. त्यास २००० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला.

0 comments:
Post a Comment