नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात आल्याची दर दिवसाला साधारण दहा ते वीस क्विंटल आवक होत आहे. आल्याची मागणी वाढली असून चार ते पाच हजार रुपये प्रती क्विंटलला दर मिळत आहे. शेवगा, गवार, लसून, सिमला मिरचीलाही चांगला दर मिळाला.
नगर बाजार समितीत भुसार, भाजीपाल्याची आवक बऱ्यापैकी होत असली तरी गेल्या आठवडाभरात भुसारची फारशी आवक झाली नाही. भाजीपाल्यात टोमॅटोची मागील पंधरा दिवसाच्या तुलनेत आवक कमी झाली आहे. मागील आठवड्यात टोमॅटोची दर दिवसाला चाळी ते पन्नास क्विंटलची आवक होत आहे.
एक हजार ते दोन हजार रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची वीस ते तीस क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते तीन हजार, कोबीची चाळीस ते साठ क्विंटलची आवक होऊन पाचशे ते एक हजार रुपये दर मिळाला.
काकडीची वीस ते पंचवीस क्विंटलची आवक होऊन पाचशे ते एक हजार रुपये, घोसाळ्याची चार ते दहा क्विंटलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार, दोडक्याची पंधरा ते पंचवीस क्विटंलची आवक होऊन दीड हजार ते तीन हजार, कारल्याची वीस ते तीस क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते आडीच हजार, भेंडीची पंचवीस ते पस्तीस क्विंटलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार, वालाची पाच ते आठ क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते आडीच हजार रूपये दर मिळाला.
लसणाची सात ते दहा क्विटंलची आवक झाली. त्यास पाच हजार ते बारा हजार रुपयांचा दर मिळाला. घेवड्याची आठ ते पंधरा क्विटंलची आवक झाली. त्यास दोन हजार ते तीन हजार रूपये दर मिळाला. बटाट्यांची साडे तिनशे ते चारशे क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते दोन हजार चारशे रुपयांचा दर मिळाला.
दुधी भोपळ्याची साधारण पंचवीस ते पस्तीस क्विटंलची आवक झाली. दर आठशे ते बाराशे रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची तीस ते चाळीस क्विंटलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार, शिमला मिरची वीस ते पंचवीस क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते तीन हजार रूपये दर मिळाला. शेवग्याची आठ ते पंधरा क्विंटलची आवक होऊन चार हजार ते पाच हजार रुपयांचा दर मिळाला. दुधी भोपळ्याची वीस ते पंचवीस क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते तीन हजार रुपयांचा दर मिळाला. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, चवळीला अधिक मागणी राहिली.
सिताफळांच्या आवकेत वाढ
भुसारमध्ये गावराण ज्वारी, बाजरी, मुग, तूर, हरभरा, गुळडाग, गव्हाची आवक झाली. मात्र दर जेमतेम होते. फळांतही सिताफळ, मोसंबी, संत्रा, डाळिंब, पपई, अननसाची आवक होत आहे. सिताफळांची आवक वाढत आहे, असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले.

0 comments:
Post a Comment