Monday, August 10, 2020

सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला उठाव

सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात  वांगी, ढोबळी मिरची, काकडीला चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक तुलनेने कमी राहिली. पण, मागणी असल्याने दरांत सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची  २० ते ३० क्विंटल, ढोबळी मिरची आणि काकडीची प्रत्येकी ५ ते १० क्विंटल अशी आवक राहिली.  त्यांची सर्व आवक स्थानिक भागातूनच राहिली.  गेल्या काही दिवसांपासून वांगी आणि ढोबळी मिरचीला चांगला उठाव मिळतो आहे.  वांग्याला प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये,  ढोबळी मिरचीला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये आणि काकडीला  किमान १२०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. 

गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत १०० ते २०० रुपयांच्या फरकाने दर वाढले आहेत.  विशेषतः वांगी आणि ढोबळी मिरचीचे दर वाढले आहेत. त्याशिवाय हिरवी मिरची, गवार, भेंडी यांचे दर काहिसे स्थिर राहिले. त्यांची आवकही प्रत्येकी १० ते ३० क्विंटलपर्यंत होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, गवारीला किमान २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, तर भेंडीला किमान ८०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला.  

भाज्यांना या सप्ताहातही उठाव कायम होता.  त्यात कोथिंबिर आणि मेथीला सर्वाधिक मागणी आणि दर मिळाला. भाज्यांची आवक प्रत्येकी दहा हजार पेंढ्यापर्यंत राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी १००० ते १४०० रुपये,  मेथीला १००० ते १२०० रुपये आणि शेपूला ६०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याचा दर स्थिर

कांद्याचे दर या सप्ताहातही पुन्हा स्थिरच राहिले. कांद्याचे लिलाव आठवड्यातून फक्त दोनदा होत आहेत. त्यांची आवक तशी जेमतेम राहिली. प्रतिदिन २० ते ४० गाड्यापर्यंत राहिली. शिवाय बाहेरील जिल्ह्यातून सर्वाधिक आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ४५० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.

News Item ID: 
820-news_story-1597063056-284
Mobile Device Headline: 
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला उठाव
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi In Solapur, pick green chillies, brinjals and cucumbers
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, बळी, Bali, ढोबळी मिरची, capsicum, मिरची, गवा, भेंडी, Okra, कोथिंबिर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In Solapur, pick green chillies, brinjals and cucumbers
Meta Description: 
In Solapur, pick green chillies, brinjals and cucumbers सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात  वांगी, ढोबळी मिरची, काकडीला चांगला उठाव मिळाला.

0 comments:

Post a Comment