शेतकऱ्यांच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्याच्याकडील पशुधन. बैलांच्या या कष्टाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा करतात. मात्र, सण साजरा करतेवेळी अनेक चुकीच्या रूढी आणि परंपरांमुळे पशुधनाला इजा होऊ शकते.
अलिकडे शेतीत यांत्रिकिकरणाचा वापर वाढत असला तरी शेतीतील छोट्या मोठ्या कामासाठी पशुधनाचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्या सचोटीइतकाच त्याच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो. बैलांच्या या कष्टाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा करतात. काही भागात श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला, तर काही भागात भाद्रपद महिन्यात पोळा साजरा करतात.
पोळ्या दिवशी बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांना रंगवले जाते. त्यांची शिंगे रंगवली जातात. त्यांच्या शरीरावर रंगबिरंगी झुली घालून सजवले जाते. विधिवत पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र, सण साजरा करण्याच्या काही परंपरा, रूढी किंवा उत्साहामध्ये काही चुका केल्या जातात. त्यामुळे बैलांच्या आरोग्यास इजा पोचू शकते.
परंपरा व त्यामुळे होऊ शकणाऱ्या इजा
बैलांना घातली जाणारी अंघोळ
या वर्षी महाराष्ट्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. परिणामी नद्या, नाले, ओढे यात मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यावर बैलांच्या अंघोळी प्राधान्याने केल्या जातात. मात्र, या साठलेल्या पाण्यामध्ये जिवाणू, विषाणू,परोपजीवी व त्यांची अंडी असू शकतात. बैलांच्या जखमांद्वारे किंवा पाणी पिण्यामुळे बैलांना संसर्ग होऊ शकतो. पाण्यामध्ये संपूर्ण गावातील जनावरे धुण्यासाठी येतात. यातून अन्य जनावरांच्या शरीरावरील परोपजीवी उदा. गोचीड, उवा, लिखा व त्यांची अंडी इ. निरोगी बैलांवरही प्रादुर्भाव करू शकतात.
उपाय
- बैलांच्या अंघोळीसाठी जलसाठ्यातील, गढूळ, दूषित पाण्याचा वापर प्रकर्षाने टाळावे. स्वच्छ पाणी वापरावे.
- शरीरावरील जखमांवर उपचारासाठी प्रतिजैविकांची योग्य मात्रा पशूवैद्यकाकडून वेळीच टोचून घ्यावी.
- बैल सार्वजनिक जलस्रोताच्या संपर्कात आले असल्यास बाह्य परोपजीवीनाशक औषधांची शरीरावर फवारणी करावी. जनावरांना जंतनाशक पाजावे.
शिंग साळणे व शिंग रंगवणे
बैल जास्तीत-जास्त आकर्षक दिसावे म्हणून शेतकरी शिंगांना आकार देतात. त्यासाठी ती साळण्याची पद्धत आहे. शिंग साळण्यासाठी वापरली जाणारे साधन धारदार व निर्जंतुक नसल्यास जखम वा इजा होण्याचा संभव असतो. त्यातून शिंगाच्या कर्करोगाचा (Horn Cancer) चा धोका उद्भवतो. शिंगाच्या कर्करोगावर शिंग समूळ कापणे, हा एकमात्र उपाय पशुवैद्यकाकडे राहतो. अशा शिंग नसलेल्या बैलाची बाजारातील किंमत कमी होते. साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू गंजलेली असल्यास धनुर्वात होण्याची शक्यता असते. शिंग रंगवण्यासाठी ऑइल पेंटचा वापर करतात. अशा रंगामध्ये झिंक ऑक्साइड, टायटॅनियम डायऑक्साइड, कॅडमियम सारखे त्वचेला घातक रसायने असू शकतात.
उपाय
- शिंग साळणे शक्यतो टाळावे.
- साळताना जखम झाली असल्यास उपचार करून धनुर्वात रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
- शिंग रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरावे.
तेल आणि अंड्याचे मिश्रण पाजणे
बैल तजेलदार, मांसल व धष्टपुष्ट दिसावेत, यासाठी तेलातून अंडी पाजली जातात. हे मिश्रण चुकीच्या पद्धतीने पाजले जाते. त्यामुळे बैल ठसकतात आणि मिश्रण अन्ननलिकेऐवजी श्वासनलिकेतून फुफ्फुसात जाते. फुफ्फुसाचा दाह म्हणजे न्यूमोनिया होऊन जनावर दगावू शकते.
उपाय
- मिश्रण पाजताना योग्य काळजी घ्यावी. जनावर ठसकणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
- तेल, अंडी यात स्निग्ध पदार्थ व प्रथिने असतात. ती स्नायूंना बळकट करण्यासाठी व वजन वाढवण्यास उपयुक्त ठरतात. मात्र, त्यांना पर्याय म्हणून तेलवर्गीय बियांच्या पेंडीचा वापर करावा. हेतू साध्य होईल आणि धोकाही टळेल.
पिठाचे गोळे व पोळ्या चारणे
पोळ्याच्या दिवशी व त्याआधी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे व नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या, कडधान्याचा भरडा चारला जातो. प्रमाणाबाहेर चारल्या जाणाऱ्या ऐवजामुळे पोटाच्या चौथ्या व सर्वांत मोठ्या भागाची व्याधी निर्माण होते. रक्तातील लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण वाढून जिवाला धोका निर्माण होतो.
उपाय
- पोटाच्या व्याधीमुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारते, दात खाते, जीभ चावते, चारही पाय वर करून उजव्या बाजूस लोळते. अशी लक्षणे दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे.
- प्राथमिक उपचार म्हणून पाणी व खाण्याच्या सोड्याचे मिश्रण पाजावे. पाजताना जनावर ठसकणार नाही, याची काळजी घ्यावी.
बैलांची मिरवणूक
पोळ्या दिवशी संध्याकाळी सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. फटाके वाजवले जातात. मिरवणूकीत बऱ्याच ठिकाणी बैल पळवले जातात अशा वेळी अनेक ठिकाणी दुर्घटना घडून बैल गंभीर जखमी होतात. काही बैलांना-पशूंना अशा वेगाने पळण्याची सवय नसते म्हणून ती उधळतात. त्यांच्या आतड्याला पीळ पडण्याची दाट शक्यता असते. या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेतानाच गर्दी व मिरवणूका टाळल्यास शक्यतो चांगले.
संपर्क- डॉ. प्रविण पतंगे, ९८९०७४९४२९
(पशुधन विकास अधिकारी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.)

0 comments:
Post a Comment