Friday, November 27, 2020

कांद्यावर फुलकिडे,करपा रोगाचा प्रादुर्भाव

सध्या शेतात रोपवाटिकांमध्ये रब्बी कांद्याची रोपे दहा ते पंधरा दिवसांची झाली आहेत. खरीप कांदा काढणीला आला असून रांगडा कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतामध्ये रांगडा कांद्याचे पीक उभे आहे. त्याच प्रमाणे लसूण आणि बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्यांची रोपे शेतात दिसून येत आहेत.  

रब्बी कांदा रोपवाटिका 

  • पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी करावी. 
  • खुरपणीनंतर ५०० वर्ग मीटर क्षेत्राकरिता २ किलो या प्रमाणात नत्र द्यावे. 
  • शक्यतोवर ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. 
  • फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास फिप्रोनील किंवा प्रोफेनोफॉस १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
  • रब्बी कांद्यावर जांभळा आणि तपकिरी करपा दिसून येतो. या रोगांच्या नियंत्रणाकरिता ट्रायसायक्लॅझोल किंवा हेक्साकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

खरीप कांदा काढणी

  • खरिपाच्या कांदा पिकाची काढणी वेगवेगळ्या जातींनुसार पुनर्लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांनी करावी. खरिपात कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही. अशा वेळी पीक काढणीच्या दोन किंवा तीन दिवस आधी रिकामा बॅरल फिरवून कृत्रिमरीत्या माना पाडाव्या लागतात. शेत कोरडे असताना पीक काढणी करावी. 
  • कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन-चार दिवस सुकण्यास पडू द्यावा. प्रत्येक वाफ्यातील कांदा अशा रीतीने ठेवावा की, दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. 
  • तीन-चार दिवसात कांद्याची पात पूर्णपणे सुकते. कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब मान ठेऊन कापावी. नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावे. राहिलेले चांगले कांदे गोळा करून सावलीत १०-१२ दिवस ठेवावे. 
  • खरिपात काढणीच्या वेळी पावसाची शक्यता वाटत असल्यास पिकाची काढणी लवकर म्हणजे ९०-१०० दिवसांनी सुद्धा करता येईल. मात्र असे कांदे ताबडतोब बाजारात विकावे.

      रांगडा कांद्याचे पीक 

  • पावसामुळे शेतात पाणी साचले असल्यास ते बाहेर काढावे. 
  • नत्र खताचा पहिला हप्ता ३५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. 
  • पुनर्लागणीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी. 
  • नत्र खताचा दुसरा हप्ता ३५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. 
  • फवारणीद्वारे सूक्ष्म द्रव्ये ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी द्यावी. 
  • सलग तीन दिवस पाऊस, ८५ टक्क्यांपेक्षा अधिक सापेक्ष आर्द्रता आणि ढगाळ वातावरण असल्यास काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या रोगाच्या नियंत्रणासाठी १ ग्रॅम हेक्साकोनॅझोल प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार प्रॉपिकोनॅझोल १ ग्रॅम  प्रति लिटर अधिक प्रोफेनोफॉस १ मिलि प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे फुलकिडे आणि पानांवरील रोगाचे नियंत्रण होईल.

   कांदा बीजोत्पादनाचे व्यवस्थापन 

  • नत्र खताचा पहिला हप्ता ३० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. 
  • नत्र खताचा दुसरा हप्ता ३० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. 
  • ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर अधिक फिप्रोनील १ मिलि प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचे नियंत्रण होईल. 
  • पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने प्रोफेनोफॉस १ मिलि प्रति लिटर अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात करावी. 
  • जर वरील फवारणीनंतर सुद्धा फुलकिडे आणि पानांवरील रोग यांचे नियंत्रण झाले नाही तर कार्बोसल्फान १ मिलि प्रति लिटर अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.

लसूण पिकाचे व्यवस्थापन 

  •  नत्र खताचा पहिला हप्ता २५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. 
  • नत्र खताचा दुसरा हप्ता २५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. 

  • लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी सूक्ष्मद्रव्यांची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पानांवर फवारणी करावी. 
  • कार्बोसल्फान २ मिलि प्रति लिटर पाणी अधिक ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
  • पहिल्या फवारणीच्या १५ दिवसांनी आवश्यकतेनुसार फिप्रोनील १ ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक मॅन्कोझेब १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
  • दुसऱ्या फवारणीच्या १५ दिवसानंतर प्रोफेनोफॉस १ मिलि प्रति लिटर पाणी अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

- डॉ. शैलेंद्र गाडगे,९९२२४९०४८३
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, जि.पुणे)

News Item ID: 
820-news_story-1606480630-awsecm-445
Mobile Device Headline: 
कांद्यावर फुलकिडे,करपा रोगाचा प्रादुर्भाव
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture Agricultural News Marathi article regarding pest and disease management in Onion.
Author Type: 
External Author
डॉ. शैलेंद्र गाडगे,  डॉ. राजीव काळे, डॉ. मेजर सिंह
Search Functional Tags: 
Seed Production, सिंचन, खत
Twitter Publish: 
Meta Keyword: 
pest and disease management in Onion.
Meta Description: 
pest and disease management in Onion. सध्या शेतात रोपवाटिकांमध्ये रब्बी कांद्याची रोपे दहा ते पंधरा दिवसांची झाली आहेत. खरीप कांदा काढणीला आला असून रांगडा कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतामध्ये रांगडा कांद्याचे पीक उभे आहे. त्याच प्रमाणे लसूण आणि बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्यांची रोपे शेतात दिसून येत आहेत.

0 comments:

Post a Comment