Tuesday, December 1, 2020

कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस सुरुवात; दर स्थिर

कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून गुळाच्या आवकेत वाढ झाली आहे. बाजार समितीत दररोज पंधरा ते वीस हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. गुळास प्रति क्विंटल ३५०० ते ४३०० रुपये इतका दर मिळत आहे. 

ऑक्टोबरच्या मध्यात झालेल्या पावसाने गुळाची आवक थंडावली होती. आता ती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. दिवाळी झाल्यानंतर गुळाच्या आवकेत वाढ सुरु झाली. सध्या ऊस प्लॉट वाफसा स्थितीत आल्याने गुळासाठी उसाची तोडणी वेगात सुरु आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत सुमारे दोनशे गुऱ्हाळघरे सुरू झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये राधानगरी, पन्हाळा तालुक्‍यात मोजकीच गुऱ्हाळे सुरू होती. पावसाने त्यातही व्यत्यय आला. ऑक्‍टोंबर शेवटच्या आठवड्यात केवळ एक ते दोन हजार गूळ रवेच बाजार समितीत येत होते. दिवाळी सणानंतर बहुतांशी भागातील मजूर गुऱ्हाळघरांवर दाखल झाले. यानंतर गूळ हंगामास वेग येत असल्याचे गुऱ्हाळ घर मालकांनी सांगितले.

गुळाचे असे आहेत दर (प्रति क्विंटल/रुपयांत)
एक किलोच्या बॉक्‍सला ३००० ते ४२०० 
स्पेशल गूळ रवे  ४२०० ते ४५००
पहिला दर्जा ३९०० ते ४१००
दुसरा दर्जा  ३५०० ते ३८००
तिसरा दर्जा ३००० ते ३५००
चौथा दर्जा २७०० ते ३०००

News Item ID: 
820-news_story-1606836087-awsecm-788
Mobile Device Headline: 
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस सुरुवात; दर स्थिर
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून गुळाच्या आवकेत वाढ झाली आहे. बाजार समितीत दररोज पंधरा ते वीस हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. गुळास प्रति क्विंटल ३५०० ते ४३०० रुपये इतका दर मिळत आहे. 

ऑक्टोबरच्या मध्यात झालेल्या पावसाने गुळाची आवक थंडावली होती. आता ती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. दिवाळी झाल्यानंतर गुळाच्या आवकेत वाढ सुरु झाली. सध्या ऊस प्लॉट वाफसा स्थितीत आल्याने गुळासाठी उसाची तोडणी वेगात सुरु आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत सुमारे दोनशे गुऱ्हाळघरे सुरू झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये राधानगरी, पन्हाळा तालुक्‍यात मोजकीच गुऱ्हाळे सुरू होती. पावसाने त्यातही व्यत्यय आला. ऑक्‍टोंबर शेवटच्या आठवड्यात केवळ एक ते दोन हजार गूळ रवेच बाजार समितीत येत होते. दिवाळी सणानंतर बहुतांशी भागातील मजूर गुऱ्हाळघरांवर दाखल झाले. यानंतर गूळ हंगामास वेग येत असल्याचे गुऱ्हाळ घर मालकांनी सांगितले.

गुळाचे असे आहेत दर (प्रति क्विंटल/रुपयांत)
एक किलोच्या बॉक्‍सला ३००० ते ४२०० 
स्पेशल गूळ रवे  ४२०० ते ४५००
पहिला दर्जा ३९०० ते ४१००
दुसरा दर्जा  ३५०० ते ३८००
तिसरा दर्जा ३००० ते ३५००
चौथा दर्जा २७०० ते ३०००

English Headline: 
agriculture news in marathi Jaggery arrival increases in Kolhapur APMC, Rates remains stable
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कोल्हापूर, बाजार समिती, agriculture Market Committee, ऊस, नगर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Jaggery arrival increases in Kolhapur APMC, Rates remains stable
Meta Description: 
Jaggery arrival increases in Kolhapur APMC, Rates remains stable कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून गुळाच्या आवकेत वाढ झाली आहे. बाजार समितीत दररोज पंधरा ते वीस हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. गुळास प्रति क्विंटल ३५०० ते ४३०० रुपये इतका दर मिळत आहे. 

0 comments:

Post a Comment