Friday, October 1, 2021

बऱ्हाणपूरला केळीला हंगामातील सर्वाधिक दर

जळगाव :  खानदेशात केळीचे दर टिकून आहेत. मध्य प्रदेशातील केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बऱ्हाणपूर येथील बाजारात गुरुवारी (३० सप्टेंबर) केळीला हंगामातील विक्रमी १४३३ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जळगाव, धुळ्यातही दर्जेदार केळीच्या दरात क्विंटलमागे १० ते २० रुपयांची वाढ झाली असून, कमाल दर १२३० रुपये प्रतिक्विंटल एवढा झाला आहे. 

सणासुदीसह कमी आवकेमुळे केळीचा यंदा चांगले दर आहेत. उत्तरेकडील म्हणजेच पंजाब, काश्मीर, दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये केळीला मोठा उठाव आहे. राज्यातही सणासुदीसह इतर फळांची आवक बाजारात कमी असल्याने केळीला उठाव आहे. खानदेशात दर्जेदार केळीची काढणी सुरू आहे. सध्या कांदेबाग केळी काढणीसाठी उपलब्ध असून, ही केळी फक्त जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव, जामनेर भागांत आहे. तसेच धुळ्यातील शिरपुरात कांदेबाग केळी काढणीवर आहे. 

केळी उत्पादनात आघाडीवर असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागांत केळी काढणीसाठी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. या भागात जुनारी व पिलबाग केळीच काढणीवर आहे. कमी दर्जाच्या केळीला खानदेशात ७०० रुपये, तर मध्य प्रदेशात किमान ७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. बऱ्हाणपूर येथे गुरुवारी १३० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता)  केळीची आवक झाली. जळगाव व धुळ्यात मिळून गुरुवारी १८० ट्रक केळीची आवक झाली. 

दर टिकून राहतील...
चोपडा, जळगाव, भडगाव-पाचोरा  भागात गिरणा, तापी नदीकाठी दर्जेदार केळी काढणीसाठी उपलब्ध आहे. उत्तरेकडे बॉक्समध्ये पॅकिंग करून केळीची पाठवणूक सुरू आहे. उत्तरेकडील मॉल, आठवडी बाजार सुरू आहेत. शिवाय दिल्ली येथील आझादपूर बाजारातही केळीला मोठी मागणी आहे. या भागातील मोठे खरेदीदार यावलमधील फैजपूर, रावेरातील सावदा, चोपडा आदी भागांतील एजंटच्या मदतीने केळीची खरेदी करून घेत आहेत. या महिन्यात केळीचे दर टिकून राहतील. कारण सणासुदीचे दिवस आहेत. तसेच नवरात्रोत्सवदेखील सुरू होणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

News Item ID: 
820-news_story-1633116192-awsecm-825
Mobile Device Headline: 
बऱ्हाणपूरला केळीला हंगामातील सर्वाधिक दर
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Highest Banana rate quoted in Barhanpur in the season
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मध्य प्रदेश, Madhya Pradesh, केळी, Banana, जळगाव, Jangaon, खानदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, रावेर, मुक्ता, नवरात्र
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Highest Banana rate quoted in Barhanpur in the season
Meta Description: 
Highest Banana rate quoted in Barhanpur in the season मध्य प्रदेशातील केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बऱ्हाणपूर येथील बाजारात गुरुवारी (३० सप्टेंबर) केळीला हंगामातील विक्रमी १४३३ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

0 comments:

Post a Comment