कोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले जावे, असा सर्वमान्य निर्णय झालेला असतानाही काही मोजक्या व्यापाऱ्यांनी मंगळवारी (ता.१२) बॉक्सचे वजन धरण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटले याचा परिणाम गूळ सौदे बंद होण्यास झाला.
गेल्या आठ दिवसांत चार वेळा सौदे बंद पडल्याने गुळाचा हंगामच वादग्रस्त ठरत आहे. बाजार समितीच्या अशासकीय मंडळ व प्रशासनाने व्यापाऱ्यांना बॉक्सचे वजन धरण्याचा निर्णय झाला आहे, त्याची अंमलबजावणी करावी, असे सूचित केले यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.
शाहू मार्केट यार्डात गूळ सौद्यामध्ये गूळा सोबत त्याला पॅकिंग केलेल्या बॉक्सचे वजन धरावे, त्याचे पैसेही व्यापाऱ्यांनी द्यावेत. यामागणीवरून व्यापारी शेतकरी यांच्या वाद सुरू आहेत, त्यात शनिवारी झालेल्या बैठकीत बाजार समितीने गुळाच्या बॉक्सचे वजन धरावे, अशी सूचना व्यापाऱ्यांना केली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. १२) गुळ सौद्यांना सुरवात झाली. ३६०० रुपयांचा सरासरी भाव सौद्यात निघाला, याच वेळी काही व्यापाऱ्यांनी बॉक्सचे पैसे देण्यास किंवा वजन धरण्यास नकार दिला. यावरून वादाला सुरुवात झाली. शेतकरी संतप्त झाले, सौदे बंद पडले.
गदारोळ सुरू असतानाच बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील तसेच अशासकीय मंडळाचे सदस्य सौदया ठिकाणी गेले त्यांनी व्यापाऱ्यांना या पूर्वीच्या बैठकीत सांगितल्या प्रमाणे बॉक्सचे वजन धरावे लागेल. त्याचे पैसे द्यावे लागतील असे सांगितले. यावेळी काही व्यापाऱ्यांनी विरोध केला तर शेतकऱ्यांनी बॉक्सचे वजन धरा असा पवित्रा घेतला. यातही पुन्हा वाद झाला. अशासकीय प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील आले त्यांनीही व्यापाऱ्यांना बोलावून घेतले तसेच बाजार समितीने यापूर्वी बॉक्सचे वजन धरा, असे सांगितले आहे. त्याची अंमलबजावणी करावीच लागेल, असे ठामपणे सांगितले त्यानंतर सौदे पुन्हा सुरू झाले.
व्यापाऱ्यांसोबत
आज पुन्हा बैठक
यंदाच्या गुळ हंगामात गुळाला सरासरी ३६०० ते ३७०० क्विंटलचे भाव आहे. बहुतांशी गुळ गुजरात बाजारपेठेत पाठवला जातो. मात्र तेथेही स्पर्धा असल्याने गुळाची मागणी कमी झाली. त्यामुळे व्यापाऱ्याना पूर्वी सारखा व्यवसाय होत नाही नुकसान होते. त्यामुळे बॉक्सचे पैसेही देणेही परवडत नाही. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व मुद्यांवर पुन्हा एकदा व्यापारी व अशासकीय मंडळ यांच्यात आज (बुधवारी) चर्चा होणार आहे. मात्र त्यासाठी सौदे बंद करू नयेत, अशी सूचना अध्यक्ष के. पी. पाटील यांनी यावेळी केली.

0 comments:
Post a Comment