पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची मागणी वाढू लागली आहे. मात्र राज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे झेंडूची फुले भिजल्याने नुकसान झाले आहे. परिणामी, आवक संतुलित राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. मंगळवारी (ता.१२) झेंडूला प्रति किलोला ५० ते ९०, तर शेवंतीला ८० ते १५० रुपये
दर होता.
दसऱ्या निमित्तच्या फुलांची आवक आणि बाजार भावाबाबत पुणे बाजार समितीमधील फूल व्यापारी सागर भोसले म्हणाले, ‘‘नवरात्रात मंदिरे खुली झाल्यामुळे फुलांची मागणी आणि दर वाढले आहेत. गणेशोत्सवानंतर फुलांचे दर चांगले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील झेंडूच्या फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे दसऱ्यानिमित्ताने होणारी आवक संतुलित राहील असा अंदाज आहे. तर मागणी वाढलेली राहील आणि दर ९० ते १०० रुपयांपर्यंत राहील असा अंदाज आहे.’’
मंगळवारी (ता.,१२) विविध फुलांचे दर झेंडू - ५०-९०, गुलछडी १२०-२००, बिजली ५०-१००, ॲस्टर (पाच गड्ड्यांचे भाव) - १०-२५, सुटा प्रति किलो - ५०-१००, शेवंती ८०-१५०, जुई १००-१५००, चमेली १३००, गुलाब गड्डी -२--३०, लिली बंडल (५० काडी) - २०-३०, जरबेरा २०-४०, कार्नेशन - ८०-१५०.

0 comments:
Post a Comment