Monday, October 11, 2021

नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी वाढली; दरात सुधारणा

नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात आवक १८,५१० क्विंटल झाली. आवकेत वाढ होऊनही मागणी असल्याने दरात सुधारणा दिसून आली. त्यास प्रतिक्विंटल १,२०० ते ३,६०० मिळाला. तर सरासरी दर २,७०० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार आवारात लसणाची आवक २८३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ९,५०० तर सरासरी दर ७,२०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ७,१८५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५० ते १,४०० तर सरासरी दर ८०० रुपये राहिला. आल्याची आवक ५५२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४,००० ते ५,५०० तर सरासरी दर ४,५०० रुपये राहिला.

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार चढ-उतार झाला. वालपापडी-घेवड्याची आवक ६,००८ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४,००० ते ५,५०० असा, तर सरासरी दर ४,७०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,००० ते ३,०००, तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक ३१५ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,५०० ते ३,५०० रुपये, तर सरासरी दर ३,००० रुपये मिळाला. मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. वाटाण्याची आवक १६९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२,००० ते १४,००० तर सरासरी दर १३,००० रुपये राहिला. गाजराची आवक २,१४३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,००० ते ३,००० तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते १,२०० तर सरासरी ६००, वांगी ४०० ते १,०००, तर सरासरी ७०० व फ्लॉवर १५० ते ४८०सरासरी ३७५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला ८० ते ८०, तर सरासरी ५५ रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३५० ते ६००, तर सरासरी दर ४५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते ३५५, तर सरासरी १७०,कारले १४० ते २१०, तर सरासरी १७०, गिलके ३२५ ते ४६५ तर सरासरी ४००,दोडका ३०० ते ४४० तर सरासरी दर ३७० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १,४२० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १,५००, तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ९,४८१ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४०० ते २०,००० तर सरासरी १०,००० रुपये दर मिळाला. 

News Item ID: 
820-news_story-1633956011-awsecm-537
Mobile Device Headline: 
नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी वाढली; दरात सुधारणा
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi Summer onion in Nashik Demand increased; Rate improvement
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, टोमॅटो, बळी, Bali, ढोबळी मिरची, capsicum, केळी, Banana, डाळिंब
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Summer onion in Nashik Demand increased; Rate improvement
Meta Description: 
Summer onion in Nashik Demand increased; Rate improvement नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात आवक १८,५१० क्विंटल झाली. आवकेत वाढ होऊनही मागणी असल्याने दरात सुधारणा दिसून आली.

0 comments:

Post a Comment