Monday, October 4, 2021

तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणा

पुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात सुधारणा झाली. चालू सप्ताहात महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर तूर उत्पादक राज्यांत मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत तुरीचे दर दबावात होते. या दरात तुरीला चांगली मागणी होती. त्यामुळे दरात गेल्या काही दिवसांपासून सुधारणा होत आहे. केंद्र सरकारने हंगाम २०२१-२२ साठी तुरीसाठी हमीभाव ६३०० रुपये जाहीर केला आहे. तर राज्यातील बाजारात समित्यांत मागील काही दिवसांत प्रतिक्विंटल ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली आहे. चालू सप्ताहात सोलापूर बाजार समितीत ६५०० ते ६६५० रुपये दर तुरीला मिळाला. अकोला बाजार समितीत ६७०० ते ६८०० रुपये, नागपूर बाजार समितीत ६९५० ते ७००० रुपये, लातूर बाजार समितीत ६५३० ते ६५६० रुपये आणि सोलापूर बाजार समितीत ६५०० ते ६६५० रुपये दर मिळाला. 

कर्नाटकात चालू सप्ताहात तुरीच्या दरात प्रतिक्विंटल ५० रुपये वाढ झाली. येथील बाजारांत तुरीला बऱ्यापैकी दर मिळाला आहे. गुलबर्गा बाजार समितीत तुरीला प्रतिक्विंटल ६४०० ते ६८०० रुपये, बिदर बाजार समितीत ५७०१ ते ६५११ आणि तीलकोट बाजार समितीत ६००० ते ६३२५ रुपये दर मिळाला.

दिल्लीच्या बाजारात तुरीच्या दरात चालू सप्ताहात ५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती. येथील बाजारात हरियानात येणाऱ्या तुरीचे दर १०० रुपयांनी सुधारले आहेत. येथे जुन्या तुरीला ६५५० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर नव्या तुरीला ६००० ते ६७५० रुपये दर मिळाला.

महत्त्वाच्या घडामोडी

  • आफ्रिकी देशांतून तूर आयातीला विलंब होण्याची शक्यता
  • मोझांबिकमधून तुरीच्या दोन खेप दाखल होण्याचा अंदाज
  • परंतु ही तूर मागणीच्या तुलनेत नगण्य
  • आयातीच्या निर्णयाचा फारसा बाजारावर परिणाम होणार नाही नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
News Item ID: 
820-news_story-1633358252-awsecm-501
Mobile Device Headline: 
तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणा
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

पुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात सुधारणा झाली. चालू सप्ताहात महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर तूर उत्पादक राज्यांत मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत तुरीचे दर दबावात होते. या दरात तुरीला चांगली मागणी होती. त्यामुळे दरात गेल्या काही दिवसांपासून सुधारणा होत आहे. केंद्र सरकारने हंगाम २०२१-२२ साठी तुरीसाठी हमीभाव ६३०० रुपये जाहीर केला आहे. तर राज्यातील बाजारात समित्यांत मागील काही दिवसांत प्रतिक्विंटल ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली आहे. चालू सप्ताहात सोलापूर बाजार समितीत ६५०० ते ६६५० रुपये दर तुरीला मिळाला. अकोला बाजार समितीत ६७०० ते ६८०० रुपये, नागपूर बाजार समितीत ६९५० ते ७००० रुपये, लातूर बाजार समितीत ६५३० ते ६५६० रुपये आणि सोलापूर बाजार समितीत ६५०० ते ६६५० रुपये दर मिळाला. 

कर्नाटकात चालू सप्ताहात तुरीच्या दरात प्रतिक्विंटल ५० रुपये वाढ झाली. येथील बाजारांत तुरीला बऱ्यापैकी दर मिळाला आहे. गुलबर्गा बाजार समितीत तुरीला प्रतिक्विंटल ६४०० ते ६८०० रुपये, बिदर बाजार समितीत ५७०१ ते ६५११ आणि तीलकोट बाजार समितीत ६००० ते ६३२५ रुपये दर मिळाला.

दिल्लीच्या बाजारात तुरीच्या दरात चालू सप्ताहात ५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती. येथील बाजारात हरियानात येणाऱ्या तुरीचे दर १०० रुपयांनी सुधारले आहेत. येथे जुन्या तुरीला ६५५० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर नव्या तुरीला ६००० ते ६७५० रुपये दर मिळाला.

महत्त्वाच्या घडामोडी

  • आफ्रिकी देशांतून तूर आयातीला विलंब होण्याची शक्यता
  • मोझांबिकमधून तुरीच्या दोन खेप दाखल होण्याचा अंदाज
  • परंतु ही तूर मागणीच्या तुलनेत नगण्य
  • आयातीच्या निर्णयाचा फारसा बाजारावर परिणाम होणार नाही नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
English Headline: 
Agriculture news in Marathi Rs 50 to Rs 100 improvement in tar price
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
महाराष्ट्र, Maharashtra, कर्नाटक, तूर, पुणे, हमीभाव, Minimum Support Price, सोलापूर, बाजार समिती, agriculture Market Committee, अकोला, Akola, नागपूर, Nagpur, लातूर, Latur, हरियाना
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rs 50 to Rs 100 improvement in tar price
Meta Description: 
Rs 50 to Rs 100 improvement in tar price ​मागणी वाढल्याने देशभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात सुधारणा झाली. चालू सप्ताहात महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर तूर उत्पादक राज्यांत मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली.

0 comments:

Post a Comment