Monday, October 4, 2021

केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटल दर

जळगाव : केळी दरात गेल्या दोन दिवसात किरकोळ घसरण झाली आहे. क्विंटलमागे २० ते ५० रुपयांची घसरण झाली असून, कमाल दर १२२० व किमान दर ७०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. 

किमान दरात फारशी घसरण झालेली नाही. पण कमाल दरात क्विंटलमागे २० ते ५० रुपयांची घसरण झाली आहे. कमाल दर १२४० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात कमाल दर १४३३ रुपये प्रतिक्विंटल या दरात केळीचे लिलाव गेल्या आठवड्यात झाले होते. पण बऱ्हाणपूर येथेही रविवारी (ता. ३) केळीला लिलावात प्रतिक्विंटल १३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

केळीची आवक खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांत वाढली आहे. परिणामी दरात किरकोळ घसरण झाली आहे. दर्जेदार केळीला उठाव चांगला आहे. पण कमी दर्जाच्या केळीला कमी दरात विक्री करण्याची वेळ येत आहे. दर्जेदार केळीला उत्तर भारतात चांगली मागणी आहे. 

केळीची आवक जळगाव, धुळ्यात मिळून १९० ट्रकवर (एक ट्रक १५ टन क्षमता) पोचली आहे. आवकेत १० ते ११ ट्रकची वाढ झाली आहे. बऱ्हाणपूर येथेही प्रतिदिन १३२ ट्रक केळीची आवक गेले चार दिवस राहिली आहे. आवकेत काहीशी वाढ झाली आहे. कांदेबाग केळीची काढणी वेगात सुरू झाली आहे. तसेच पाऊसही कमी आहे. 

यामुळे काढणीला वेग आला आहे. पुढे आवक काहीशी वाढू शकते, असाही अंदाज आहे. कारण केळी पक्व होण्याची प्रक्रिया गतीने होत आहे. चांगला पाऊस झाल्याने केळीसाठी अनुकूल स्थिती तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

News Item ID: 
820-news_story-1633359911-awsecm-657
Mobile Device Headline: 
केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटल दर
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

जळगाव : केळी दरात गेल्या दोन दिवसात किरकोळ घसरण झाली आहे. क्विंटलमागे २० ते ५० रुपयांची घसरण झाली असून, कमाल दर १२२० व किमान दर ७०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. 

किमान दरात फारशी घसरण झालेली नाही. पण कमाल दरात क्विंटलमागे २० ते ५० रुपयांची घसरण झाली आहे. कमाल दर १२४० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात कमाल दर १४३३ रुपये प्रतिक्विंटल या दरात केळीचे लिलाव गेल्या आठवड्यात झाले होते. पण बऱ्हाणपूर येथेही रविवारी (ता. ३) केळीला लिलावात प्रतिक्विंटल १३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

केळीची आवक खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांत वाढली आहे. परिणामी दरात किरकोळ घसरण झाली आहे. दर्जेदार केळीला उठाव चांगला आहे. पण कमी दर्जाच्या केळीला कमी दरात विक्री करण्याची वेळ येत आहे. दर्जेदार केळीला उत्तर भारतात चांगली मागणी आहे. 

केळीची आवक जळगाव, धुळ्यात मिळून १९० ट्रकवर (एक ट्रक १५ टन क्षमता) पोचली आहे. आवकेत १० ते ११ ट्रकची वाढ झाली आहे. बऱ्हाणपूर येथेही प्रतिदिन १३२ ट्रक केळीची आवक गेले चार दिवस राहिली आहे. आवकेत काहीशी वाढ झाली आहे. कांदेबाग केळीची काढणी वेगात सुरू झाली आहे. तसेच पाऊसही कमी आहे. 

यामुळे काढणीला वेग आला आहे. पुढे आवक काहीशी वाढू शकते, असाही अंदाज आहे. कारण केळी पक्व होण्याची प्रक्रिया गतीने होत आहे. चांगला पाऊस झाल्याने केळीसाठी अनुकूल स्थिती तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi 1220 per quintal for banana
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, केळी, Banana, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, खानदेश, भारत, ऊस, पाऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
1220 per quintal for banana
Meta Description: 
1220 per quintal for banana ​केळी दरात गेल्या दोन दिवसात किरकोळ घसरण झाली आहे. क्विंटलमागे २० ते ५० रुपयांची घसरण झाली असून, कमाल दर १२२० व किमान दर ७०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. 

0 comments:

Post a Comment