Monday, November 15, 2021

नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिर

नगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक स्थिर राहिली. काही भाज्यांच्या दरात सुधारणा झाली. भुसारमध्येही आवक आणि दर नेहमीप्रमाणे स्थिर राहिल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. 

नगर येथील कृषी बाजार समितीत टोमॅटोला ११८ ते १२० क्विंटलची दर दिवसाला १८०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्यांची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३५००, फ्लॉवरची ३२ ते ३५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, कोबीची ५० ते ५५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२००, काकडीची ५८ ते ६२ क्विंटलची आवक होऊन ८०० ते १८००, गवारीला ७००० ते ८५००, घोसाळ्याची २ ते ५ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३ हजार, कारल्याची १२ ते १५ क्विंटलची आवक होऊन १८०० ते ३ हजार, भेंडीची ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार रुपये दर मिळाला.

वाल शेंगाची ५ ते १० क्विंटलची आवक होऊन २८०० ते ४ हजार २००, बटाट्याची २७८ ते ३०० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, हिरव्या मिरचीची ८० ते १०० क्विंटलची आवक होऊन ३ हजार 
ते ४ हजार ५००, शेवग्याची २ ते ४ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते १० हजार, शिमला मिरचीची ४४ ते ५० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजाराचा दर मिळाला. 

पालेभाज्यात कोथिंबिरीच्या ६ हजार ७०० जुड्याची आवक होऊन शंभर जुड्यांना ८०० ते १२००, मेथीच्या ४ हजार  ते ४ हजार ५०० जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्यांना १५०० ते २ हजार रुपये, शेपुच्या ३४५ ते ४०० जुड्यांची आवक होऊन ९०० ते १२००, पालकच्या २५० ते ३०० जुड्यांची आवक होऊन ८०० ते १ हजार रुपयाचा शंभर जुड्यांना दर मिळाला. 

भुसारची आवक कायम 

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान ज्वारीची आवक अल्प आहे. ज्वारीला १६०० ते  १९५० रुपयांचा दर मिळत आहे. आवक कमी असूनही दर कमी आहे. बाजरीला १५२५ ते १६००, हरभऱ्याला ४००० ते ४५५०, मुगाला ५१०० ते ७०००, मठाला ५०००, लाल मिरचीला ३००० ते १२६१०, सोयाबीनला ४ हजार ते ५३१० रुपयाचा दर मिळाला आहे.

News Item ID: 
820-news_story-1636975591-awsecm-723
Mobile Device Headline: 
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिर
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, Incoming of vegetables is stable in Nagar Bazar Samiti
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, नगर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, टोमॅटो, गवा, भेंडी, Okra, मिरची, कोथिंबिर, ज्वारी, Jowar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Incoming of vegetables is stable in Nagar Bazar Samiti
Meta Description: 
Incoming of vegetables is stable in Nagar Bazar Samiti नगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक स्थिर राहिली. काही भाज्यांच्या दरात सुधारणा झाली. भुसारमध्येही आवक आणि दर नेहमीप्रमाणे स्थिर राहिल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. 

0 comments:

Post a Comment