सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सिमला मिरची, वांगी, गवारीला मागणी वाढली. त्यामुळे त्यांचे दरही तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सिमला मिरचीची आवक रोज २० ते ३० क्विंटल, वांग्यांची ४० ते ६० क्विंटल आणि गवारची पाच ते सात क्विंटलपर्यंत आवक राहिली. या फळभाज्यांची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक नव्हतीच. सिमला मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, वांग्यांना किमान ५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये, तर गवारीला किमान ४००० रुपये, सरासरी ४५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये दर मिळाला.
त्याशिवाय हिरवी मिरची, काकडीलाही चांगला उठाव मिळाला. त्यांची आवकही तशी जेमतेम राहिली. काकडीची रोज १० ते १५ क्विंटल आणि हिरव्या मिरचीची ३० ते ४० क्विंटलपर्यंत आवक राहिली.
काकडीला प्रतिक्विंटलला किमान १७०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये, तर हिरव्या मिरचीला किमान १२०० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. घेवड्याच्या दरातही या सप्ताहात किंचित वाढ झाली. घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये इतका दर मिळाला.
लसूण, लाल मिरचीचे दर टिकून
या सप्ताहात लसूण आणि लाल मिरचीलाही चांगली मागणी राहिली. त्यांचे दरही टिकून राहिले. त्यांची आवक स्थानिक भागातून झाली. लसणाला प्रतिक्विंटलला किमान १८०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपये, तर लाल मिरचीला प्रतिक्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ७००० रुपये तर सर्वाधिक १४००० रुपये दर मिळाला.

0 comments:
Post a Comment