Monday, December 13, 2021

नाशिकमध्ये डाळिंबाची आवक स्थिर; दर सुधारले

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या डाळिंब आवक स्थिर आहे. मागणी वाढल्याने दरात सुधारणा होत आहे. गत सप्ताहात डाळिंबांची आवक २,१८७ क्विंटल झाली. त्यास ५०० तर १२,५०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ९००० रुपये राहिले. यापूर्वीच्या सप्ताहात डाळिंबांची आवक २,१४४ क्विंटल झाली. मृदुला वाणास प्रतिक्विंटल ४५० ते १,०००० तर सरासरी ७,५०० दर मिळाला. सध्या क्विंटलमागे सरासरी १,५०० रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक ५,०९४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते २,६५० तर सरासरी दर १,७०० रुपये राहिला. तर खरीप लाल कांद्याची आवक २,२६९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते २,००० तर सरासरी दर १,१५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ९,०७४  क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १,६०० तर सरासरी दर १,००० रुपये राहिला. लसणाची आवक २५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ८,५०० तर सरासरी दर ५,५०० रुपये राहिला. आल्याची आवक ४६० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,००० ते २,०००, तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला.

सप्ताहात काही फळभाज्यांच्या दरात आवकेनुसार चढ-उतार दिसून आला. घेवड्याला प्रतिक्विंटल ४,००० ते ६,००० तर सरासरी दर ५,००० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक १४४३ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १,००० ते १,७००, तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला.  वाटाण्याची आवक १३०८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,५०० ते ३,७०० तर सरासरी दर २,७०० रुपये राहिला. आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. गाजराची आवक १,९३६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,७०० ते ३,७०० तर सरासरी दर २,७०० रुपये राहिला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ७० ते ७५०, तर सरासरी ४५०, वांगी ३५० ते ८२५ तर सरासरी ६०० व फ्लॉवर ५० ते ३००सरासरी १२५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला १२५ ते ३४५ तर सरासरी२५० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ५५० ते ८०० तर सरासरी दर ६७५ रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १७० ते ४५० तर सरासरी ३२५, कारले २५० ते ४०० तर सरासरी ३२०, गिलके ४०० ते ५७५ तर सरासरी ५०० व दोडक्याला ४०० ते ९०० तर सरासरी दर ७०० रुपये असे प्रति १२ किलोस मिळाले. केळीची आवक १,४६० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १,५००, तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला. 

News Item ID: 
820-news_story-1639399696-awsecm-667
Mobile Device Headline: 
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक स्थिर; दर सुधारले
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi Pomegranate in Nashik Inward stable; Rates improved
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, डाळ, डाळिंब, खरीप, मिरची, टोमॅटो, ढोबळी मिरची, capsicum, केळी, Banana
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pomegranate in Nashik Inward stable; Rates improved
Meta Description: 
Pomegranate in Nashik Inward stable; Rates improved नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या डाळिंब आवक स्थिर आहे. मागणी वाढल्याने दरात सुधारणा होत आहे. गत सप्ताहात डाळिंबांची आवक २,१८७ क्विंटल झाली. त्यास ५०० तर १२,५०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ९००० रुपये राहिले.

0 comments:

Post a Comment