नागपूर ः कळमना बाजार समितीत महिनाभरापूर्वी सोयाबीनचे दर खाली आले होते. त्यानंतर सोयाबीन दरात आता काहीशी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सद्यःस्थितीत सोयाबीनचे दर ५००० ते ६६३२ रुपये या प्रमाणे आहेत. सोयाबीनची आवक ११९० क्विंटल असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
सोयाबीन दरात वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता साठवणुकीवर भर दिला आहे. महिनाभरापूर्वी सोयाबीनचे दर ४५०० ते ५००० रुपयांपर्यंत होते. त्यात वाढ होऊन हे दर सहा हजारावर पोहोचले आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे. कळमना बाजार समितीत गहू आवक ४०० क्विंटल तर दर १८०५० ते २२१२, तांदूळ आवक ३० आणि दर २७०० ते ३०००, हरभरा दर ४१०० ते ४६०० आणि आवक १६६ क्विंटलची होती. तुरीचे व्यवहार ५५०० ते ५७११ रुपयांनी झाली. तुरीची आवक देखील जेमतेम १७ क्विंटलच्या घरात असल्याची माहिती देण्यात आली.
बाजारात मोसंबीची देखील आवक नियमित असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या फळांचे व्यवहार १७०० ते २१०० रुपये क्विंटलने झाले. त्याचवेळी मध्यम आकाराच्या फळांना १५०० ते १७०० आणि लहान फळांना ५०० ते ७०० रुपये दर मिळाला. या आठवड्यात लहान फळांना ५०० ते ७००, मध्यम फळांना १४०० ते १८०० आणि मोठ्या फळांना १६०० ते २२०० रुपये असा दर होता.
संत्रा आवक जोमात
कळमणा बाजार समितीत संत्रा फळांची आवक सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना २२०० ते २३०० रुपये क्विंटलचा दर होता. संत्र्यांची आवक ३००० क्विंटलच्या घरात होती. या आठवड्यात ३००० क्विंटल आवक होत व्यवहार १८०० ते २४०० रुपयांनी झाले. गेल्या आठवड्यात लहान आकाराच्या संत्र्याला ५०० ते ८०० रुपये, मध्यम फळांना १४०० ते १६०० रुपये असा दर होता. या आठवड्यात लहान फळांचे दर ६०० ते ८०० आणि मध्यम आकाराच्या फळांचे दर १४०० ते १६०० रुपये क्विंटलवर पोचले.

0 comments:
Post a Comment