नगर ः येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याच्या दरात सुधारणा कायम आहे. आठवडा भरात भाजीपाल्याची आवकही वाढलेली आहे. दर दिवसाला १४०० ते १ हजार ५०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. भुसारची आवकही बऱ्यापैकी होत आहे. सोयाबीनचा दर ६४५० रुपयांवर स्थिर आहे.
नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत मागील आठवड्यात दररोज टोमॅटोची २०० ते २२५ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटल १ हजार ते २ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची ८२ ते ९० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ८ हजार रुपयांचा दर मिळाला. फ्लॉवरची १४० ते १५० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार, काकडीची ९५ क्विंटलची आवक होन ५०० ते १८००, गवारची २ ते ४ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ९ हजार, घोससाळ्याची २ ते ५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजार, कारल्याची २७ ते ३० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार ५००, भेंडीची ३२ ते ३५ क्विंटलची आवक होऊन २ जार ते ६ हजार, घेवड्याची २ ते ४ क्विंटलची आवक होऊन २ ते ५ हजार रुपये दर मिळाला.
बटाट्याची २१० ते २३० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार ५००, हिरव्या मिरचीची १२० ते १३० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, शेवग्याची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ११ हजार, लिंबांची १७ ते २० क्विंटलची आवक होऊन ५०० ते २०००, शिमला मिरचीची ३० ते ४० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ६ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.
भुसारची दीड हजार क्विंटल आवक
नगर येथील बाजार समितीत भुसारची गेल्या आठवड्यात दर दिवसाला दीड क्विटंलपर्यंत आवक झाली. ज्वारी, बाजरीच्या दरात फारसा बदल झाला नाही. सोयाबीनला ४५०० ते ६४२५, काबुली चन्याला ६९००, तुरीला ४७०० ते ५८००, हरभऱ्याला ३५०० ते ४५००, मुगाला ५६०० ते ६६००, उडदाला ५५०० ते ६०००, गव्हाला १७७५ ते २०५० रुपयांचा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment