Thursday, December 9, 2021

राज्यात कांदा ३०० ते ३००० रुपये क्विंटल

परभणीत क्विंटलला १५०० ते २००० रुपये 

परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.९) कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २००० रुपये, तर सरासरी १७५० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा तसेच स्थानिक परिसरातून आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी कांद्याची आवक होते. शनिवारी (ता.४) कांद्याची ५०० क्विंटल, तर मंगळवारी (ता.७) १०० क्विंटल आवक झाली. गेल्या महिनाभराच्या तुलनेत आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडी सुधारणा झाली. 

गुरुवारी (ता.९) घाऊक दर प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये होते. विविध ठिकाणच्या बाजारात किरकोळ विक्री ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने सुरु होती, असे ठोक व्यापारी मो.आवैस यांनी सांगितले.

सोलापुरात क्विंटलला १५०० ते ३००० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपयांपर्यंत, तर सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची रोज २०० ते २५० गाड्यांपर्यंत आवक राहिली. गेल्या पंधरवड्यापासून कांद्याच्या आवकेत वाढ होते आहे. स्थानिक भागासह शेजारील जिल्ह्यातूनही कांद्याची आवक होते आहे. पण कांद्याला सध्या पुरेसा उठाव नाही. त्यातच गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे खराब कांद्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दरात चढ-उतार होतो आहे. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहातही आवक अशीच प्रतिदिन १०० ते २०० गाड्यांपर्यंत होती. दरात मात्र फारशी सुधारणा नव्हती. दर स्थिर होते. या सप्ताहात कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १५० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये असा दर होता, असे सांगण्यात आले.

औरंगाबादमध्ये क्विंटलला ४०० ते २२०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.९) कांद्याची ९१५ क्विंटल आवक झाली. त्यास ४०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ डिसेंबरला कांद्याची आवक १२०१ क्विंटल झाली. दर ४०० ते १३०० रुपये राहिले. ४ डिसेंबरला ८७६ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ४०० ते १४०० रुपये राहिले. ५ डिसेंबरला १०१२ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ४०० ते २२०० रुपये दर मिळाला. ६ डिसेंबरला ७१४ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचा दर ३०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटल राहिला. 

सात डिसेंबरला ७५० क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ३०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. ८ डिसेंबरला कांद्याची आवक ३७० क्विंटल, तर दर ६०० ते १८०० रुपये राहिले.

नागपुरात क्विंटलला १५०० ते २५०० रुपये

नागपूर : नागपूरच्या महात्मा फुले बाजारपेठ तसेच कळमना बाजार समितीत पांढऱ्या व लाल कांद्याची आवक नियमित होत आहे. कळमना बाजार समितीत दोन्ही कांद्याची सरासरी प्रत्येकी एक हजार क्विंटल आवक असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला ही आवक दोन हजार क्विंटलपर्यंत होती. लाल कांद्याला १५०० ते २५०० रुपये आणि पांढऱ्या कांद्याला ३५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आवक कमी झाल्याचे सांगण्यात आले. सद्यःस्थितीत आवक तब्बल एक हजार क्विंटलने खाली आली आहे. लाल कांद्याचे व्यवहार १५०० ते २५०० रुपयांनी होत आहेत. पांढऱ्या कांद्याच्या दरात काहीशी घसरण अनुभवण्यात आली आहे. पांढऱ्या 
कांद्याचे दर २५०० ते ३००० रुपये क्विंटल आहेत. नागपूरच्या किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे.

नांदेडमध्ये क्विंटलला १००० ते २५०० रुपये

नांदेड : नांदेड येथील बोंढार बाजारात बुधवारी (ता. ८) कांद्याची आवक २०० टन झाली. त्यास १००० ते २५०० रुपये दर मिळाल्याची माहिती ठोक व्यापारी युनूस बागवान यांनी दिली. 

नांदेड शहराजवळील बोंढार येथे कांदा, आले, लसूण, बटाटा मार्केट आहे. या ठिकाणी बुधवारी व रविवारी मालाची आवक होते. बुधवारी दोनशे टन कांद्याची आवक झाली. हा कांदा औरंगाबाद जिल्ह्यातून येत आहे. सध्या नांदेडला औरंगाबाद येथून कांदा येतो. मागील एक महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्यातील कांदा सुरू झाला आहे. पुढील तीन महिने हा कांदा बाजारात येतो, अशी माहिती बागवान यांनी दिली. 

दरम्यान किरकोळ बाजारात मात्र कांदा ४० ते ६० रुपये दराने विक्री होत आहे. आठवडे बाजारात कांद्याची वाढीव दराने विक्री होत असल्याची माहिती मिळाली.

जळगावात क्विंटलला ३०० ते १००० रुपये 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.९)  कांद्याची ११०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ३०० ते १००० सरासरी ५०९ असे होते. आवक जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जळगाव, धुळे, साक्री आदी भागातून होत आहे. दर  घसरले आहेत.

सांगलीत क्विंटलला ७०० ते २८०० रुपये

सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला बाजार आवारात गुरुवारी (ता.९) कांद्याची १४४१ क्‍विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते २८००, तर सरासरी १७५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात सातारा, सोलापूर, नगर, पुणे या जिल्ह्यातून कांद्याची आवक होते. बुधवारी (ता. ८) कांद्याची ३६३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते ३००० तर सरासरी २००० रुपये दर मिळाला.

मंगळवारी (ता.७) कांद्याची ११५३ क्‍विंटल आवक झाली. दर १००० ते ३२०० तर सरासरी २१०० रुपये मिळाला. सोमवारी (ता.६) कांद्याची ३४१९ क्‍विंटल आवक झाली. त्यावेळी ५०० ते ३००० तर सरासरी १७५० रुपये दर मिळाला. शनिवारी (ता.४) कांद्याची २४३८ क्‍विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल १००० ते २८०० तर सरासरी १९०० रुपये दर मिळाला.

News Item ID: 
820-news_story-1639050325-awsecm-260
Mobile Device Headline: 
राज्यात कांदा ३०० ते ३००० रुपये क्विंटल
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, Onion in the state is Rs. 300 to 3000 per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
परभणी, Parbhabi, नगर, सोलापूर, पूर, Floods, व्यापार, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, औरंगाबाद, Aurangabad, नागपूर, Nagpur, महात्मा फुले, नांदेड, Nanded, गवा, जळगाव, Jangaon, धुळे, Dhule, भाजीपाला बाजार, Vegetable Market, पुणे
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Onion in the state is Rs. 300 to 3000 per quintal
Meta Description: 
Onion in the state is Rs. 300 to 3000 per quintal परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.९) कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २००० रुपये, तर सरासरी १७५० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

0 comments:

Post a Comment