कडक उन्हाळा आणि सतत व जोरदार पावसाचा कालावधी वगळता वर्षभर ग्लॅडिओलसची लागवड शक्य. मात्र खरीप आणि रब्बी हेच दोन हंगाम प्रमुख समजले जातात. सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होऊन फुलांचे रंगही चांगले येतात.
कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस हे एक व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे फूल पीक आहे. मूळस्थान दक्षिण आफ्रिका असलेल्या या पिकाची जगातील बहुतांश देशांमध्ये लागवड केली जाते. भारतात दिल्ली, कोलकाता, मुंबई, बंगळूर आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात लागवड केली जाते. फुलदाणीत ठेवल्यास ग्लॅडिओलसच्या लांब दांड्यावरील आकर्षक रंगीत फुले सात ते आठ दिवस क्रमाने उमलतात.
हवामान
कडक उन्हाळा आणि सतत व जोरदार पावसाचा कालावधी वगळता वर्षभर ग्लॅडिओलसची लागवड शक्य. मात्र खरीप आणि रब्बी हेच दोन हंगाम प्रमुख समजले जातात. सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होऊन फुलांचे रंगही चांगले येतात. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी उन्हाळा सौम्य असल्यामुळे हे पीक चांगले येते. या कालावधीत फुलांचा तुटवडा असल्याने दरही चांगले मिळतात. मागणी आणि दर यांचा विचार करता संपूर्ण पिकाची एकाच वेळी लागवड करण्यापेक्षा १५ ते २० दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने लागवड फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव आहे.
जमीन
मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन या पिकास मानवते.
चोपण, खारवट व चुनखडीयुक्त जमीन या पिकास मानवत नाही. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.
लागवडीसाठी बेणे
- योग्य जातींच्या निरोगी आणि विश्रांती पूर्ण झालेल्या कंदांची निवड करावी. लागवडीसाठी ४ सेंमी अथवा त्याहून अधिक व्यास असलेले कंद निवडावेत. हे कंद कॅप्टन ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवावेत.
- सरी, वरंबा, सपाट वाफे किंवा गादीवाफे पद्धतीने लागवड करता येते. सपाट अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड करताना दोन ओळीत ३० सेंमी, तर दोन कंदांत १५ ते २० सेंमी अंतर ठेवावे.
- पाण्याचा निचरा चांगला होणे, पिकांमध्ये कामाची सुलभता, फुलदांडे सरळ येणे आणि फुले काढणीनंतर कंदांचे पोषण या कारणांमुळे सरी-वरंबा पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते. अशा पद्धतीने लागवड करताना दोन सरींतील अंतर ४० ते ४५ सेंमी व दोन कंदांतील अंतर १० ते १५ सेंमी अंतर ठेवून लागवड करावी. हेक्टरी सव्वा ते दीड लाख कंद पुरेसे होतात.
जाती
व्यापारीदृष्ट्या लागवड करताना मागणी असलेल्या योग्य जातींची निवड महत्त्वाची असते.
उत्तम जातीच्या निकषांमध्ये
- फुलांचा आकर्षक रंग
- फुलदांड्यावरील एकूण फुलांची संख्या कमीत कमी चौदा असावी.
- कीड व रोग प्रतिकारक्षमता
- उच्च उत्पादनक्षमता
- लागवड करणार असलेल्या हवामानात चांगली येणारी जात निवडावी.
परदेशात आणि भारतात विविध ठिकाणी संकरित जाती तयार केलेल्या आहे. मात्र वेगवेगळ्या हवामानात त्या कशा वाढतात, याविषयी कमी क्षेत्रामध्ये प्रयोग करावे. नंतरच मोठ्या प्रमाणावर लागवडीचा निर्णय घ्यावा. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतील गणेशखिंड, पुणे येथील अखिल भारतीय समन्वित पुष्प संशोधन प्रकल्पामध्ये परदेशी व भारतीय ग्लॅडिओलस जातींचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. काही संकरित जातींची निर्मितीही केली आहे.
ग्लॅडिओलसच्या विविध जाती
| जातीचे नांव | फुले येण्यास लागणारे दिवस | फुलदांड्यावरील फुलांची संख्या | फुलांचा रंग |
| संसरे | ७७ | १७-१८ | पांढरा |
| यलोस्टोन | ८० | १५-१६ | पिवळा |
| ट्रॉपीकसी | ७७ | १३-१४ | निळा |
| फुले गणेश | ६५ | १६-१७ | फिकट पिवळा |
| फुले प्रेरणा | ८० | १४-१५ | फिकट गुलाबी |
| सुचित्रा | ७६ | १६-१७ | फिकट गुलाबी |
| नजराणा | ८१ | १३-१४ | गर्द गुलाबी |
| पुसा सुहागन | ८४ | १३-१४ | लाल |
| हंटिंग साँग | ८० | १४-१५ | केशरी |
| व्हाइट प्रॉस्पॅरिटी | ८१ | १५-१६ | पांढरा |

खत व्यवस्थापन
- लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत चांगले मिसळून द्यावे.
- ग्लॅडिओलस पिकामध्ये हेक्टरी ६० ते १०० टन शेणखत जमिनीच्या मगदुराप्रमाणे ३०० ते ४०० किलो नत्र, १५०-२०० किलो स्फुरद आणि १५० ते २०० किलो पालाश खते द्यावी. पालाश व स्फुरदची संपूर्ण मात्रा लागवडीवेळी द्यावी. नत्राची मात्रा तीन समान हप्त्यांत विभागून पिकाला २, ४ व ६ पाने आल्यावर म्हणजेच लागवडीनंतर ३, ५ व ७ आठवड्यांनी द्यावी.
- लागवडीनंतर पिकाला नियमितपणे, परंतु योग्य पाण्याचा आवश्यक तेवढा पुरवठा करावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे दोन पाळ्यांतील अंतर ७ ते ८ दिवसांचे असावे.
- फुले काढून घेतल्यावरही कंदाच्या वाढीसाठी पुढे एक ते दीड महिना नियमित पाणी देण्याची आवश्यकता असते. लागवडीनंतर एक ते दोन खुरपण्या व महिन्यातून एकदा हलकिशी खांदणी करून पिकाला मातीची भर द्यावी. अशा पद्धतीने पिकास भर दिली असता फुलदांडे सरळ येण्यास, जमिनीतील कंदांचे चांगले पोषण होण्यास मदत होते .
फलांची काढणी व उत्पादन
- लागवडीनंतर निवडलेल्या जातीनुसार आणि कंदांना दिलेल्या विश्रांतीच्या काळानुसार ६० ते ९० दिवसांत फुले फुलू लागतात.
- पुढे महिनाभर काढणी चालू राहते. फुलांच्या दांड्यावरील पहिले फूल कळीच्या अवस्थेत असताना रंग दाखवून उमलू लागते. अशा अवस्थेत झाडाची खालची पाने शाबूत ठेवून फुलांचे दांडे छाटून घ्यावेत.
- फुलदांड्यांच्या लांबीनुसार प्रतवारी करून बारा फुलांच्या दांड्यांची एक याप्रमाणे जुड्या बांधून त्याभोवती वर्तमानपत्राचा कागद बांधून अथवा कागदाच्या खोक्यात १५ ते २० जुड्या भरून विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठेत पाठवावे.
- एक हेक्टर क्षेत्रातून दीड ते दोन लाख फुलदांडे मिळतात.
- फुलांच्या चांगल्या उत्पादनासाठी कंदाची काढणी आणि साठवण या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
- फुलदांडे काढताना झाडावर चार पाने ठेवलेली असतात. या चार पानांकडून तयार केल्या जाणाऱ्या अन्नांवर जमिनीत कंदांचे पोषण होत असते. सुमारे दीड ते दोन महिन्यात झाडांची ही हिरवी पाने पिवळी पडून सुकू लागतात. अशा वेळी पिकास पाणी देणे बंद करावे.
- पाणी देणे बंद केल्यानंतर १० ते १५ दिवसांनी जमिनीतील कंद काळजीपूर्वक त्यांना इजा न होता काढावेत.
- काढलेले मोठे कंद व लहान कंद कॅप्टन २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात १५ ते २० मिनिटे भिजवावेत. मग ३ ते ४ आठवडे सावलीत सुकवून पोत्यात भरून शीतगृहामध्ये ठेवावेत. शीतगृहात साठवण केली असताना पुढील पिकाची वाढ एकसारखी होऊन फुले येण्याचे प्रमाण देखील वाढते. साठवणुकीत कंदांचा कंदकुंज या रोगापासून बचाव होतो. हेक्टरी सुमारे दीड ते दोन लाख कंद देखील मिळतात.
ग्लॅडिओलस पीक संरक्षण
कंद प्रक्रिया
- काढणीनंतर कंद प्रक्रिया केलेली असली तरी पुन्हा लागवडीच्या वेळी कंद कॅप्टन ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात २० मिनिटे भिजवून लागवड करावी.
- मातीतून काढलेले मोठे कंद व लहान कंद कॅप्टन ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात १५ ते २० मिनिटे भिजवावेत. मग ३ ते ४ आठवडे सावलीत सुकवून पोत्यात भरून शीतगृहामध्ये ठेवावेत.
पीक संरक्षण
मर रोग
रोगकारक बुरशी : फ्युजारिअम
लागवडीसाठी रोगग्रस्त कंद वापरल्यास त्यांची उगवण होत नाही. किंवा उगवण होताच रोपे पिवळी पडून मरून जातात. जमिनीतील बुरशीमुळे रोगाचा प्रादुर्भाव उशिरा झाल्यास झाडाची पाने पिवळी पडतात. झाडाची वाढ खुंटते. दांडा पिवळा पडून खुजा राहतो. फुले नीट उमलत नाहीत. शेवटी संपूर्ण झाड पिवळे पडून मरते.
उपाययोजना
- रोगग्रस्त, वेडेवाकड्या आकाराचे कंद लागवडीस वापरू नयेत.
- पिकाची फेरपालट करावी.
- मररोगास कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या जातींची लागवड करावी.
- पाने किंवा देठ खाणारी अळी
- ही कीड उगवणीनंतर रोपे जमिनीलगत कुरतडते. त्याचप्रमाणे खोडात छिद्रे पाडते, त्यामुळे रोपे सुकून मरतात.
नियंत्रण
- लागवडीपूर्वी जमिनीत दाणेदार कारटाप हायड्रोक्लोराईड २० किलो प्रति हेक्टर या प्रमाणे मातीत मिसळावे.
- प्रादुर्भाव दिसताच कडुनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम) ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- रात्री दोन ओळीमध्ये किंवा ठिकठिकाणी गवताचे ढीग करून ठेवावेत. या ढिगाखाली अळ्या जमा होतात. अशा जमा झालेल्या अळ्यांसह ते गवत उचलून नष्ट करावे.
(टीप : विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे प्रयोगाअंती चांगले निष्कर्ष मिळाले आहेत.)
- डॉ. मोहन शेटे, ९४०३४८९२२९
(विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे)

0 comments:
Post a Comment