महाराष्ट्रभर नुकत्याच झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्ष बागायतदारांसमोर संकट उभे ठाकले आहे. बहुतांश द्राक्ष विभागातील बागा या फुलोरा ते फळधारणा या दरम्यानच्या अवस्थेत आहेत. ऐन हंगामात झालेल्या पावसामुळे मणीगळ व घडकूज या समस्यांसोबतच डाऊनी मिल्ड्यूचा धोकाही वाढत आहे. कारण पूर्वी नियंत्रित झालेल्या डाऊनी मिल्ड्यू रोगाचे बिजाणू पुन्हा सक्रिय होऊ लागतील. त्यामुळे अनेक ठिकाणी वाढीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष मण्यांवरसुद्धा डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. या अवस्थेत डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव झाल्यास घडकूज होऊन मण्यांचा दर्जा घसरू शकतो. हे टाळण्यासाठी अमिसूलब्रोम (१७.७% एस. सी.) या स्पर्शजन्य बुरशीनाशकाची ०.३८ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. किंवा डायमिथोमॉर्फ (५० डब्ल्यू. पी.) ०.५० ग्रॅम प्रति लिटर किंवा मँडीप्रोपॅमीड (२३.४ % एस. सी.) ०.८ मि.लि. प्रति लिटर या बूरशीनाशकांचाही वापर करता येईल.
सध्या ज्या भागांमध्ये दव जास्त प्रमाणात पडत आहे, अशा भागांमध्ये डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी निर्यातक्षम द्राक्ष घेणाऱ्या शेतकऱ्यांनी मेटीराम (७० डब्ल्यू. पी.) या बुरशीनाशकाची ५ किलो प्रति एकर या प्रमाणे धुरळणी करावी. स्थानिक बाजारपेठेत जाणाऱ्या द्राक्षांसाठी मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) या बुरशीनाशकाचा ५ किलो प्रति एकर या प्रमाणे धुरळणीद्वारे वापर करता येईल. या सोबत पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फोरस ४ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणीही उपयुक्त ठरते.
भुरीचा प्रादुर्भाव
- डाऊनी मिल्ड्यूसोबतच काही भागांमध्ये भुरीचाही प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. भुरीच्या नियंत्रणासाठी सायफ्ल्यूफेनामाइड (५% ई. डब्ल्यू.) ०.५ मि.लि. प्रति लिटर किंवा मेट्राफेनॉन (५०% एस. सी.) ०.२५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी घेणे फायद्याचे होईल.
- भुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास, सल्फर (८०% डब्ल्यू. डी. जी.) या बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रति लिटर या दराने फवारणी करावी.
- अँपिलोमायसिस क्विसक्वालिस या जैविक बुरशीनाशकाचा भुरीच्या नियंत्रणासाठी ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे वापर करावा. ट्रायकोडर्मा २-३ मि.लि. प्रति लिटर व बॅसिलस स्पेसीज २ मि.लि. प्रति लिटर ही जैविक बुरशीनाशकेही भुरी नियंत्रणासाठी उपयोगी असल्याने त्यांचा बागेतील वापर सुरूच ठेवावा. जैविक नियंत्रक घटक (बायोकंट्रोल एजंट) व रासायनिक बुरशीनाशक एकत्रित करून (टॅंक -मिक्स) वापरू नयेत. असे केल्याने प्रभावी नियंत्रणाऐवजी फक्त खर्चात वाढ होते.
- रासायनिक बुरशीनाशकांच्या अति वापरामुळे घडकूज होऊन किंवा जखमा होऊन द्राक्षाच्या दर्जावर विपरीत परिणाम होतो. म्हणून रासायनिक घटकांचा अतिवापर करणे टाळावे.
- डॉ. सुजोय साहा, ७०६६२४०९४६
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

0 comments:
Post a Comment