औरंगाबादमध्ये क्विंटलला ३५०० ते ४००० रुपये
औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२३) वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये १६ डिसेंबरला १३ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना १००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. १८ डिसेंबरला १९ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १९ डिसेंबर रोजी १३ क्विंटल आवक झाली. त्या वेळी वांग्यांना २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. २० डिसेंबर रोजी १४ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर २००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले.
२१ डिसेंबर रोजी वांग्यांची आवक १६ क्विंटल, तर दर ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. २२ डिसेंबर रोजी ४० क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना १५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाले, अशी माहिती देण्यात आली.
नाशिकमध्ये क्विंटलला ७००० ते १२००० रुपये
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२२) वांग्यांची आवक ९९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल७,००० ते १२,००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १,०००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
वांग्यांची आवक कमी होत असून शेतमालाला उठाव कमी आहे. त्यामुळे दरात तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता.२१) वांग्यांची आवक १०७ क्विंटल झाली. त्यास ७,००० ते १०,००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ८,५०० रुपये होता. रविवारी (ता.१९) वांग्यांची आवक १४४ क्विंटल झाली. त्यास ४,००० ते ८,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६,५०० रुपये होता. सोमवारी (ता.२०) वांग्यांची आवक १०६क्विंटल झाली. त्यास ६,००० ते ९,००० प्रतिक्विंटल दर मिळाला.
सर्वसाधारण दर ७,५०० रुपये होता. शनिवारी (ता.१८) वांग्यांची आवक १३३ क्विंटल झाली. त्यास ४,५०० ते ८,३०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६,५०० रुपये होता. शुक्रवारी (ता.१७) वांग्यांची आवक १३८ क्विंटल झाली. त्यास ३,००० ते ७,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५,००० रुपये होता. गुरुवारी (ता.१६) वांग्यांची आवक ११५ क्विंटल झाली. त्यास ४,००० ते ९,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७,००० रुपये होता.
जळगावात क्विंटलला १८०० ते २६०० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२३) लहान काटेरी वांग्यांची १७ क्विंटल आवक झाली. दर १८०० ते २६०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला. हिरव्या काटेरी वांग्यांना अधिकचे दर मिळाले. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, यावल, जळगाव, चोपडा आदी भागांतून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत.
परभणीत क्विंटलला ५००० ते ८००० रुपये
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२३) वांग्यांची ७ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ८००० रुपये, तर सरासरी ६५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
सध्या स्थानिक परिसरातील गावातून वांग्यांची आवक होत आहे. फुलगळीमुळे उत्पादनात घट येत असल्यामुळे मार्केटमध्ये वांग्यांची आवक कमी होत आहे. लग्न कार्यामुळे मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात तेजी आहे. गेल्या महिनाभरात प्रत्येक गुरुवारी सरासरी ७ ते १५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ३००० ते ८००० रुपये मिळाले होते.
गुरुवारी (ता.२३) वांग्यांची ७ क्विंटल आवक असताना घाऊक दर प्रतिक्विंटल ५००० ते ८००० रुपये होते. शहरातील विविध ठिकाणच्या भाजीबाजारात किरकोळ विक्री प्रतिकिलो ८० ते १०० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोरोडे यांनी सांगितले.
नगरमध्ये क्विंटलला ३००० ते ७००० रुपये
नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २३) वांग्यांना प्रतिक्विंटल ३००० ते ७००० व सरासरी ५ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. आवक साधारणपणे ७ क्विटंल झाली.
नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार- पाच दिवसांपासून वांग्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. अठरा डिसेंबर रोजी ५४ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ७ हजार व सरासरी ४५०० रुपयांचा दर मिळाला. १४ डिसेंबर रोजी ७५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ७ हजार ५०० व सरासरी ४७५० रुपयांचा दर मिळाला. १० डिसेंबर रोजी ९३ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते सात हजार व सरासरी ४५०० रुपयांचा दर मिळाला.
मागील काही दिवसांत बदलत्या वातावरणाचा वांग्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे आवकेत सतत चढउतार होत आहे. गेल्या वीस दिवसांपासून वांग्यांचा दर तेजीत आहे. मार्गशीर्ष महिन्यामुळेही वांग्यांना मागणी अधिक आहे.
अकोल्यात क्विंटलला ४००० ते ५००० रुपये
अकोला ः येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता.२३) वांग्यांची ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाल्याची माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली. या बाजारात स्थानिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह इतर भागातूनही वांगी विक्रीसाठी प्रामुख्याने येत आहेत. बाजारात सुमारे २०० क्रेट (एका क्रेटमध्ये १५ किलो) आवक असल्याचेही सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी वांगी दर खाली आले होते. आता लग्न सराईचा हंगाम आहे. त्यामुळे वांग्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात वांगी चांगले दर मिळवत आहेत. गुरुवारी ३० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. सध्या ठोक विक्री सरासरी किमान ४ हजार ते कमाल पाच हजार रुपये क्विंटलदरम्यान झाली. किरकोळ विक्रेत्यांकडून वांगी यापेक्षा दीडपट अधिक दराने विकली जात आहेत. हे दर आणखी काही काळ टिकून राहणार असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
सोलापुरात क्विंटलला ३००० ते ९००० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दरात तेजी राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला नऊ हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची रोज १० ते १२ क्विंटल आवक झाली. वांग्याची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून वांग्याला मागणी वाढली आहे. पण त्या तुलनेत आवक नसल्याने वांग्याला उठाव मिळतो आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानेही खराब वांग्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, बाजारात आवक कमी आहे.
वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक ९००० रुपये इतका दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही वांग्याला किमान ३५०० रुपये, सरासरी ४५०० रुपये आणि सर्वाधिक ८००० रुपये असा दर मिळाला. त्यांच्या प्रतिक्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांच्या फरकाने दर तेजीत राहिल्याचे सांगण्यात आले.

0 comments:
Post a Comment