सूर्यफूल हे महत्त्वाचे गळीतधान्य पीक असून, त्यावर प्रामुख्याने केवडा, तांबेरा, काळी, सड, मर आणि पानांवरील ठिपके इ. रोगांचा प्रादुर्भाव होतो. या रोगामुळे उत्पादनात मोठी घट होते.
पानांवरील ठिपके
- रोगकारक बुरशी : अल्टरनेरिया हेलियांनथी
- सूर्यफुलाची उशिरा लागवड, अति थंड हिवाळा, तसेच पावसाळी वातावरण रोग वाढीस पोषक.
लक्षणे
- पानांवर गर्द तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. पानांवरील गर्द तपकिरी ठिपक्यांच्या कडांवर पिवळे वलय असते. असे ठिपके नंतर मोठे होऊन एकमेकांत मिसळतात. पानांवर मोठा करपलेला डाग दिसतो. झाडाची पाने करपतात, वाळतात व त्यांची गळ होते.
- असेच ठिपके झाडांचे खोड, पानांचे देठ व फुलांवरसुद्धा दिसतात.
नियंत्रणाचे उपाय
- प्रादुर्भावग्रस्त झाडांचे अवशेष काढून नष्ट करावेत.
- शक्यतो सूर्यफुलाची लागवड हंगामाच्या सुरुवातीस करावी. पुढे पीक अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो.
- ज्या ठिकाणी लागवडी राहिल्या आहेत, तिथे रोगमुक्त बियाणे वापरावे. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
- लागवडीपूर्वी बियाणास थायरम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे चोळावे.
- पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम.
तांबेरा
- रोगकारक बुरशी - पुक्सिनिया हेलीॲथी
- सुर्यफुलावरील महत्त्वाचा रोग असून, उत्पादनात मोठी घट होते.
लक्षणे
- पानांच्या खालच्या बाजूवर लालसर तपकिरी रंगाची पुरळ दिसते. अशी रोगग्रस्त पाने पिवळी पडून वाळतात. कोवळ्या पानांपेक्षा जुन्या पानांवर रोगाची प्रादुर्भाव जास्त दिसतो. जुन्या पानांवर प्रथम लहान गोलाकार भुकटीसारखे, नारंगी ते काळ्या रंगाचे पुरळ विखुरलेले दिसतात.
- रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास खोड, पानांचे देठ व फुलांच्या भागांवर तांबेरा पडलेला दिसतो. त्यामुळे पाने अकाली गळतात. पिकाचे उत्पादन व दाण्यांची प्रत खालावते.
नियंत्रणाचे उपाय
- रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांचे अवशेष, गवत व शेतातील काडी कचरा इ. जाळून नष्ट करावा.
- शेतात बिगर हंगामात उगवलेली सूर्यफुलाची झाडे उपटून नष्ट करावी.
- एकाच शेतात सूर्यफुलाचे पीक सतत घेऊ नये.
- लागवडीसाठी ॲडमायरल, मॉर्डेन, सूर्या, आर-१ व आर-२ सारख्या तांबेरा रोगास प्रतीकारक्षम जातींची निवड करावी.
- लागवडीसाठी रोगमुक्त व प्रमाणित बियाणे वापरावे.
- सखल जमिनीमध्ये सूर्यफुलाचे पीक घेऊ नये. जमीन निचरा होणारी असावी.
- लागवडीपूर्वी कॅप्टन २.५ ग्रॅम किंवा थायरम २.५ ग्रॅम प्रति किलो बियणे या बीजप्रक्रिया करावी.
- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, फवारणी प्रति लिटर पाणी
- मॅन्कोझेब २.५ ग्रॅम.आणि अन्य काही पर्याय
केवडा (डाऊनी मिल्ड्यू)
- रोगकारक बुरशी - प्लाझमोपॅरा हॅलस्टेडी
- रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासूनच होतो.
- दमट हवामानात रोगाची वाढ वेगाने होते.
लक्षणे
- रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास रोपे मरतात. शेतातील रोपांच्या संख्येत घट होते.
- रोगामुळे झाडाची वाढ भिन्न प्रमाणात खुंटलेली दिसते.
- पाने पिवळसर दिसतात. खालील जुन्या पानांपासून वरील कोवळ्या पानांपर्यंत हिरव्या व हरितद्रव्यरहित रंगाच्या छटा पानांवर दिसतात.
- कोवळी पाने मुरडतात. पानांच्या मुख्य शिरा हिरव्या नसतात.
- रोगामुळे झाडे खूप खुरटी दिसतात.
- रोगग्रस्त झाडाच्या बुंध्याशी गाठ दिसते.
- रोगामुळे पाने जाड व खोड ठिसूळ बनते.
नियंत्रणाचे उपाय
- शेतातील रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
- रोगप्रतिकारक वाण किंवा एचएसएस -३ सारख्या सहनशील संकरित वाणांची निवड करावी.
- लागवडीसाठी निरोगी व प्रमाणित बियाणे वापरावे.
- लागवडीपूर्वी मेटालॅक्सील ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- फवारणी प्रति लिटर पाणी
मेटॅलॅक्झिल एम (४ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम.
मर रोग
- रोगकारक बुरशी - स्केलेरोशियम
- रोगाचा प्रसार जमिनीतून होतो.
लक्षणे
रोगाच्या प्रादुर्भाव झाल्यावर झाडाची मुळे सडतात. झाड मरते.
मोठ्या झाडाचे खोड व तबक सडते. फुलोऱ्यापासून पीक तयार होईपर्यंत हवेतील या रोगाच्या बीजाणूमुळे तबकालाही रोगाची बाधा होते. तबकावर पांढरी बुरशी वाढून संपूर्ण तबक व्यापते.
नियंत्रणाचे उपाय
- पिकांची फेरपालट करावी.
- पिकात उथळ कोळपणी करावी.
- जमिनीतील पाण्याचा चांगला निचरा करावा.
- लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
- लागवडीपूर्वी कॅप्टन २.५ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १० ग्रॅम प्रति किलो या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
- ट्रायकोडर्मा व्हिरीडी २.५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणे मातीतून दयावे.
- मर रोग नियंत्रणासाठी फेन्थिऑन या बुरशीनाशकाची १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- डॉ. ए. जी. पाटील, ८४०८०३३६८२
(सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, छ. शा. म. शि. संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, औरंगाबाद)

0 comments:
Post a Comment