Monday, January 17, 2022

रब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर तेलबियांची 'लांब उडी' !

पुणे - यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabbi Crop Sowing) एकूण १.२ टक्क्यांनी वाढली आहे. देशात आत्तापर्यंत ६६४ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या (Agriculture Ministery) ताज्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पेरणीत आठ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. त्याचबरोबर यंदा एकूण देशाचा विचार करता हवामानामुळे रब्बी पिकांची उत्पादकता खालावण्याची शक्यता अजून तरी दिसत नाही.

हेही वाचा - पुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात सुधारणा

हरियाणा आणि राजस्थानमध्ये रब्बीची पेरणी पूर्ण झाली असून महाराष्ट्राच्या अंतिम पीक पेरणी अहवालानुसार राज्यात ९९ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावरची पेरणी (Sowing) पूर्ण झाली आहे. देशात रब्बीच्या कडधान्यांचे क्षेत्र कमी अधिक प्रमाणात गेल्या वर्षीइतकेच असून १६०.२ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची पेरणी झाली आहे. तर दुसरीकडे तेलबियांच्या (Oilseed) क्षेत्रात मात्र २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १८ लाख हेक्टरने यंदा यामध्ये वाढ झाली आहे. मोहरीचे (Musterd) वाढलेले पेरणी क्षेत्र हे यामागचे कारण असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हेही वाचा - सांगलीत कांद्याच्या दरात ४०० ते ५०० रुपयांनी वाढ

आतापर्यंत झालेल्या पेरणीच्या वेळापत्रकात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कोणताही प्रभाव पडला नसल्याचे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. रब्बी पेरणीची एकूण प्रगती अत्यंत उत्साहवर्धक असून काही राज्यांमध्ये पिकांच्या नुकसानीची नोंद असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रब्बी पेरणी करणाऱ्या प्रमुख राज्यांमध्ये नुकताच चांगला पाऊस झाल्याने पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान -

११ जानेवारीच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) महाराष्ट्रात (Maharashatra) ५२७६ हेक्टर तर मध्य प्रदेशात ४८,८७१ हेक्टर, राजस्थानमध्ये ६९,३७५ हेक्टर, उत्तर प्रदेशमध्ये १,११,७०० हेक्टर, हरियाणामध्ये ९७,६७६ हेक्टरवर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर पंजाबमधील नुकसानीची अद्याप पाहणी करण्यात आलेली नाही.    

व्हिडीओ पाहा - 

बहुतेक राज्यांना या महिन्याच्या आत डाळींचे लक्षित क्षेत्र गाठण्याची अपेक्षा आहे. दक्षिण आणि पूर्व भागात भाताची पेरणी आणि लावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाईल. दुसरीकडे गव्हाची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. दरम्यान, केंद्रीय जल आयोगानुसार, १३ जानेवारीपर्यंत देशातील १३७ जलाशयांमधील साठा गेल्या वर्षीच्या याच कालवधीच्या १०१ टक्के आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या १२२ टक्के आहे. १ ते १४ जानेवारी दरम्यान देशात २९.४ मिमी पाऊस पडला आहे, जो सरासरीपेक्षा चार पट जास्त आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

News Item ID: 
820-news_story-1642426224-awsecm-445
Mobile Device Headline: 
रब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर तेलबियांची 'लांब उडी' !
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Rabi crops: Bumper harvest likely with higher acreage, conducive weather
Author Type: 
External Author
टीम ॲग्रोवन
Search Functional Tags: 
पुणे, मंत्रालय, agriculture, हवामान, मिरची, महाराष्ट्र, Maharashtra, कडधान्य, मोहरी, Mustard, कोरोना, Corona, ऊस, पाऊस, अतिवृष्टी, heavy rain, rain, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, डाळ, वर्षा, Varsha, भारत, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rabi crops: Bumper harvest likely with higher acreage, conducive weather
Meta Description: 
यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत एकूण १.२ टक्क्यांनी वाढली आहे. देशात आत्तापर्यंत ६६४ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. Rabi crops: Bumper harvest likely with higher acreage, conducive weather

0 comments:

Post a Comment