या वर्षी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागेत एकाच वेळी डाऊनी मिल्ड्यू व भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. डाऊनी मिल्ड्यू प्रमाणेच भुरी रोगामुळे देखील द्राक्ष उत्पादनात मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी भुरी रोगाची लक्षणे अचूक ओळखता येणे आवश्यक आहे.
सध्याच्या वातावरणीय बदलामुळे द्राक्ष बागा विविध रोगांना बळी पडत आहेत. सद्यःपरिस्थिती पाहता, वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहे. वाढलेली थंडी आणि सकाळी पडणाऱ्या दवामुळे द्राक्ष बागेत भुरी रोगास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. ढगाळ हवामान, कमी ते मध्यम प्रकाश, २२ ते २८ अंश सेल्सिअस इष्टतम तापमान व दमट वातावरण या बाबी भुरी रोगासाठी अनुकूल आहेत. भुरी रोगाचा प्रादुर्भाव ३५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमानाच्या तसेच थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या पानांच्या पृष्ठभागावर कमी होतो. दिवसातील कोरडे वातावरण आणि कमी तापमान अशा अनुकूल परिस्थितीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो.
घरासमोरील तुळशीचे झाड भुरी रोग येण्याची चाहूल देते. म्हणजेच भुरीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असता सर्वप्रथम याचा प्रादुर्भाव तुळशीच्या रोपावर आढळून येतो. या वर्षी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागेत एकाच वेळी डाऊनी मिल्ड्यू व भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. डाऊनी मिल्ड्यू प्रमाणेच भुरी रोगामुळे देखील द्राक्ष उत्पादनात मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी भुरी रोगाची लक्षणे अचूक ओळखता येणे आवश्यक आहे.
लक्षणे
रोगकारक बुरशी : इरिसिफे निकेटर.
- रोगाचा प्रादुर्भाव वेलीच्या सर्व हिरव्या भागावर होतो. मात्र बुरशीचे धागे प्रत्यक्ष वेलीच्या भागात प्रवेश न करता पृष्ठभागावरच वाढतात.
- पानांच्या खालील बाजूस काळसर रंगाचे डाग दिसून येतात. सुरुवातीला पानावर पिवळसर पांढरट ठिपके व नंतर ते भुरकट होऊन संपूर्ण पान काळपट दिसते. वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.
- रोगग्रस्त वेलीची वाढ खुंटून पानात विकृती येते.
- फुलोरा अवस्थेत रोगाची लागण झाल्यास फलधारणा होत नाही. फळ धारणेच्या वेळी प्रादुर्भाव असल्यास मणी अनियमित आकाराचे होतात. काही मणी अपक्वच राहतात. पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर मण्यांवर येऊन मणी तडकतात व फुटतात.
- पावसाळ्याच्या दिवसांत कमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामध्ये वाऱ्यामार्फत भुरी रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात होतो.
- वेलीवरील पाण्यामुळे कॅनॉपीमधील तापमान कमी होऊन आर्द्रता वाढते. अशा प्रकारे स्पोरूलेशन वाढून संसर्ग झपाट्याने वाढण्यास मदत होते.
व्यवस्थापन
- सद्यपरिस्थितीत टोपणगळ अवस्थेमध्ये असणाऱ्या व स्थानिक बाजारपेठेत जाणाऱ्या द्राक्ष बागेमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा. अशा बागांमध्ये सायफ्लुफेनामाइड (५ टक्के ईडब्ल्यू) ०.५ मिलि प्रति लिटर पाणी किंवा फ्लुओपायरम (२०० एस.एसी)+ टेब्यूकोनॅझोल (२०० एस.सी) संयुक्त बुरशीनाशक ०.५६३ मिलि प्रति लिटर पाणी किंवा फ्लुक्झापायरॉक्झाइड (७५ ग्रॅम प्रति लिटर) अधिक डायफेनोकोनॅझोल (५० ग्रॅम प्रति लिटर) एससी (या फॉर्म्यूलेशनचे संयुक्त बुरशीनाशक) ०.८ मिलि प्रति लिटर पाणी किंवा मेट्राफेनॉन (५० टक्के एस.सी.) ०.२५ मिलि प्रति लिटर याप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी करावी.
- बेदाणा उत्पादन घेणाऱ्या बागायतदारदेखील भुरी नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करू शकतात. फळधारणा होत असलेल्या व निर्यातक्षम बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी, सल्फर (४० एस.सी) ३ मिलि किंवा ॲम्पिलोमायसिस क्विसक्वॅलिस ५ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे वापर करावा. सल्फरच्या या फॉर्म्यूलेशनमुळे द्राक्षमण्यांवर पावडरमुळे पडणारे पांढरट डाग पडणार नाहीत. याचबरोबर भुरीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास क्लोरीन डायऑक्साइड (५० पीपीएम) २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- फवारणी सर्व पाने आणि घडांवर एकसारखी होईल याची काळजी घ्यावी. जेणेकरून सर्व बुरशी नाहीशी होऊन पुढील प्रादुर्भाव टाळला जाईल.
- दर १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोडर्मा व बॅसिलस सबटिलिस डी आर-३९ ची २ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी व ड्रेंचिंग करावे.
- राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने तयार केलेले मांजरी वाइनगार्ड द्रावण स्वरूपात व ट्रायकोशक्ती पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. फवारणीसाठी मांजरी वाईनगार्ड २ ते ५ मिलि प्रतिलिटर पाणी आणि ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर ठिबक किंवा ड्रेंचिंगद्वारे द्यावे.
- स्थानिक बाजारपेठेसाठी विक्रीसाठी उत्पादन घेणाऱ्या द्राक्ष बागांमध्ये अजूनही डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव आहे. अशा बागांमध्ये पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस ४ ग्रॅम आणि मेटीराम (७०% डब्ल्यूपी) २ ते २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे वापर करावा.
- रशियासाठी निर्यात होणाऱ्या द्राक्ष बागांमध्ये पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरसची फवारणी करू नये. रासायनिक बुरशीनाशके व जैविक नियंत्रके (बायोकंट्रोल एजंट) यांचा एकत्रित (टॅंक मिक्स) वापर करू नये.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
डॉ. सुजोय साहा, ७०६६२४०९४६
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

0 comments:
Post a Comment