लाळ्या खुरकुत रोगामध्ये दिसून येणारे दुष्परिणाम म्हणजे दुधाळ जनावरांचे दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी होते. नियमित माजावर येण्याचे प्रमाण कमी होते, वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.
लाळ्या खुरकुत रोगाची लक्षणे-
या रोगामध्ये सुरुवातीला ताप येतो, हा ताप काहीवेळेस १-३ दिवस राहू शकतो. ताप (Fever) येणे हे अनेक संसर्गजन्य रोगाचे लक्षण असतं, पण फक्त तापावरून या रोगाचे निदान करता येत नाही. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्यांच्या तोंडामध्ये येणारे फोड, तसेच पायातील मधल्या बेचक्यात फोड (ulcer) येतात. हे फोड फुटून लाल जखम (wound) तयार होते. त्वचेचा पडदा फाटतो. अशा जनावराला चारा खाता येत नाही किंवा चारा खात असताना चघळताना खूप त्रास होतो. तोंडातून गळणारी लाळ हि दोरीसारखी लांब असते. जनावरांच्या तोडांत काही नसताना देखील हि जनावरे मचमच असा आवाज येतो. हि जनावरे लंगडताना दिसतात.
लाळ्या खुरकुत रोग होण्यामागची कारणे कोणती आहेत-
हा विषाणुजन्य रोग आहे. अप्तोव्हायरस (Apthovirus) नावाचा विषाणू पिकोर्णाव्हीरीडी (Picornaviridae) या कुटुंबातील आहे. या विषाणूच्या सात जाती असून साठाहून अधिक उपजाती आढळून आलेल्या आहेत. ओ, ए, सी, आशिया -१, सॅट-१, सॅट-२ व सॅट ३ अशा सात प्रमुख जाती आहेत. आपल्याकडे ओ, ए आणि आशिया-१ या तीन जाती आढळून येतात. अधिक प्रकारच्या जाती असल्याने लसीकरणाच्या दृष्टीने प्रतिकारशक्ती तयार करण्यास बाधा आणू शकतात. हा विषाणू थंड वातावराणामध्ये अधिक आढळून येतो.
हेही वाचा- लाळ्या खुरकूत साथीने किणीत दोन म्हशींसह सात शेळ्यांचा मृत्यू
रोगाची बाधा झाल्यानंतर कोणत्या उपयोजना कराव्यात?
या काळात जनावरांची शुश्रुषा अत्यंत महत्वाची आहे. परंतु या रोगाची बाधा झाल्यानतर विशिष्ट लक्षणे ओळखून पशुवैद्कामार्फत उपचार करावा. तोंड सोड्याच्या पाण्याने धुऊन घ्यावे. दिवसातून ३ वेळा बोरोग्लिसीरीन टाकावे. पायाची स्वच्छता करून जंतुनाशकांची फवारणी करावी. अशा जनावरांना कोवळा लुसलुशीत चारा खाण्यास द्यावा. पिठाची कांजी शिजवून द्यावी.
हेही वाचा-लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसार
लाळ्या खुरकुतचं निर्मुलन करायचे असल्यास लसीकरण महत्वाच आहे. वर्षातून दोन वेळा आपण रोगाविरुद्ध लसीकरण केले पाहिजे. लसीकरण केल्यानंतर लसीमुळे प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी किमान १५ दिवस लागतात, पुढे जाऊन सहा महिन्यापर्यंत हि प्रतिकारशक्ती टिकून राहते.

FMD, Animal Disease,
Vaccination,
Foot and mouth disease
FMD, Animal Disease,
Vaccination,
Foot and mouth disease
agrowon
मराठी न्यूज
शेती
शेतकरी
dairy
Animal husbandry

0 comments:
Post a Comment