नागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना बाजारातील सोयाबीनची आवक मंदावली आहे. सद्यःस्थितीत सोयाबीनची दररोज अवघी ६०० क्विंटल इतकीच आवक होत आहे. दर ५३७० ते ६३५० रुपये आहेत. प्रक्रिया उद्योजकांकडून वाढती मागणी आणि तुलनेत आवक कमी त्यामुळे दर आणखी वधारण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी आणि मळणीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु, दरात तेजीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून पैशाची गरज असेल, तितकेच सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यात येत आहे. त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक ६०० क्विंटलवर स्थिरावली आहे.
गेल्या आठवड्यात १०४८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यानंतरच्या काळात २७४ क्विंटलवर ही आवक पोचली आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ४९०० ते ६३९० रुपये होते. या आठवड्यात हेच दर ५३०० ते ६३५० रुपयांवर पोचले आहेत. सोयाबीन दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बाजारात गव्हाची देखील नियमीत आवक आहे. गेल्या आठवड्यात गव्हाला १८३० ते २१२६ रुपये असा दर होता. या आठवड्यात १८५७ ते २१५० रुपयांवर हे दर पोचले. गव्हाची आवक २०० क्विंटल इतकी अत्यल्प आहे. तांदूळ आवक १०० क्विंटल तर दर ४५०० ते ४८०० रुपये असे होते. बाजारात हरभऱ्याची देखील आवक होत आहे. ती २९ क्विंटल आहे. ४००० ते ४१०० या दराने हरभरा व्यवहार होत आहे.
बाजारात संत्रा आवक नियमीत
बाजारात संत्र्यांची नियमित आवक होत आहे. १००० क्विंटलपर्यंत मोठ्या आकाराची फळे बाजारात येत आहेत. त्यांना २००० ते २६००, मध्यम फळांना १६०० ते १८०० आणि लहान आकाराच्या फळांना १००० ते ११०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. बाजारातील मोसंबीची आवक १००० क्विंटलची आहे. त्यातील मोठ्या फळांचे व्यवहार २५०० ते २९००, मध्यम १४०० ते १८०० आणि लहान फळांचे व्यवहार १००० ते ११०० रुपये क्विंटलने होत आहेत.

0 comments:
Post a Comment