Tuesday, January 4, 2022

नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिर

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या डाळिंब आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. मागणी असल्याने दर स्थिर असल्याचे दिसून आले. गत सप्ताहात डाळिंबाची आवक अवघी १८२ क्विंटल झाली. त्यास ४०० तर ९,५०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ७,५०० रुपये राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक ३७१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते २,७००, तर सरासरी दर २,२०० रुपये राहिला. तर, खरीप लाल कांद्याची आवक ११,६७४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते २,५००, तर सरासरी दर १,९०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ११,२७८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५० ते १,३००, तर सरासरी दर ९०० रुपये राहिला. लसणाची आवक ४५२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,५०० ते ७,५००, तर सरासरी दर ६,००० रुपये राहिला. आल्याची आवक ५८२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,०००, तर सरासरी दर १,७०० रुपये राहिला.

सप्ताहात काही फळभाज्यांच्या आवकेनुसार दरात चढ-उतार दिसून आला. वालपापडी-घेवड्याची आवक ४,९३४ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३,५०० ते ४,५०० असा तर सरासरी दर ४,००० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,००० ते ३,५०० तर सरासरी दर ३,००० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक १,१७८ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३,५०० ते ५,००० तर सरासरी दर ४,४०० रुपये राहिला. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने दर स्थिर होते. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते ६०० तर सरासरी ३००, वांगी ५०० ते १,१५० तर सरासरी ६८० व फ्लॉवर ३०० ते ५००सरासरी ४०० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १५० ते ३३० तर सरासरी२५० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. 

ढोबळी मिरचीला ४०० ते ६५० तर सरासरी दर ५५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १४० ते ३२० तर सरासरी २००, कारले ४०० ते ६०० तर सरासरी ५००,गिलके ३५० ते ५८० तर सरासरी ४६० व दोडका ५०० ते ६५० तर सरासरी दर ४६० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. 

News Item ID: 
820-news_story-1641214878-awsecm-871
Mobile Device Headline: 
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिर
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, Pomegranate in Nashik Inflows decreased; Rate fixed
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, डाळिंब, खरीप, मिरची, टोमॅटो, ढोबळी मिरची, capsicum
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pomegranate in Nashik Inflows decreased; Rate fixed
Meta Description: 
Pomegranate in Nashik Inflows decreased; Rate fixed नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या डाळिंब आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. मागणी असल्याने दर स्थिर असल्याचे दिसून आले.

0 comments:

Post a Comment